भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे रेल्वेचे जाळे असल्याचे म्हटले जाते. तर प्रत्येक दिवशी हजारे रेल्वेची सोय करण्यात आल्याने त्याच्यामाध्यमतून लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र काही वेळेस रेल्वेने लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी कन्फर्म तिकिट मिळणे थोडे मुश्किलच असते. त्यावेळी प्रवासी वेटिंग लिस्ट मधील तिकिट खरेदी करणे योग्य मानतात. परंतु वेटिंग लिस्ट मधील तिकिट असणे ही सुद्धा एक समस्या असून प्रवाशांच्या सोईसाई रेल्वेने विक्लप स्किम (Vikalp Scheme) सुरु केली आहे. या स्किमच्या माध्यमातून आयरसीटीसीची अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in च्या माध्यमातून तिकिट खरेदी करता येणार आहे.
प्रवाशांना कन्फर्म तिकिट मिळण्यासाठी आणि त्याचा फायदा होण्यासाठी एटीएएस योजना बनवण्यात आली आहे. ही योजना रेल्वेच्या सर्व श्रेणीमधील मेल/एक्सप्रेस रेल्वेगाड्यांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना अन्य रेल्वेचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. मात्र दुसऱ्या रेल्वेचा पर्याय जरी दिला असला तरीही प्रवाशाला कन्फर्म तिकिट मिळेल असे नाही. तर जाणून घ्या नियम आणि अटी.
- ही योजना बुकिंग कोटा आणि सवलीचा विचार न करता वेटिंग लिस्ट मधील सर्व प्रवाशांसाठी लागू आहे. यामध्ये कोणत्याही प्रवाशाकडून अतिरिक्त शुल्क वसूल केले जात नाही.एका पीएनआरच्या सर्व प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल अथवा नाही. त्याबाबत अधिक माहिती प्रवाशाला SMS च्या माध्यमातून दिली जाणार आहे.
- ज्या पर्यायी ट्रेनची सोय करुन दिली आहे त्याच्या वेटिंग लिस्ट मध्ये प्रवाशाचे नाव नसणार आहे. कन्फर्म आणि वेटिंग लिस्ट चार्टसह अजून एक नोटिस झळवकवी जाईल त्यामध्ये पर्यायी रेल्वेमध्ये ज्या प्रवाशांना सोय करुन दिली आहे त्यांची नावे असणार आहे.
- ज्या प्रवाशाला पर्यायी रेल्वेचे सोय केली आहे त्याला एक सामान्य प्रवासी समजले जाणार आहे.
- तसेच पर्यायी रेल्वेबाबत अधिक माहिती मिळण्यासाठी प्रवाशाला पीएनआर क्रमांकानुसार तपासणी करणे योग्य ठरणार आहे.
- प्रवाशाला या योजनेबाबत अधिक माहिती 139 क्रमांकावर फोन करुन मिळू शकते. तसेच अन्य गोष्टींबाबत www.indianrail.gov.in येथे माहिती देण्यात येणार आहे.
- परंतु जर पर्यायी रेल्वेनुसार जर तुम्हाला तिकिट मिळाल्यास तुम्ही ते रद्द करु शकत नाही. मात्र गरज असल्यास तिकिट तुम्हाला रद्द करता येणार आहे.
(रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी 'या' सोप्या स्टेप्स जाणून घ्या)
भारतीय रेल्वेची उल्लेखनीयबाब म्हणजे आयआरसीटीसीच्या माध्यमातून ऑनलाईन तिकिट, टूर पॅकेज, तेजस, स्पेशल ट्रेन सारख्या विविध सुविधा दिल्या जातात.