सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने काही जणांना आपल्या घरी जाण्यासाठी फार उत्सुकता लागून राहिलेली असते. मात्र ऐन सणाच्या काळात रेल्वेचे तिकिट मिळणे मुश्किलच होते. कारण रेल्वे तिकिट बुकिंगसाठी रेल्वे स्थानकात लांबच्या लांब रांग दिसून येते. तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तिकिट बुकिंगची सुविधा उपलब्ध झाल्याने त्या पटकन बुक होऊन जातात. अशा वेळी जर तुम्हाला रेल्वेचे कन्फर्म तिकिट हवे असल्यास काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.काही वेळेस असे ही होते आपण तिकिट काढतो तरीही आपल्याला वेटिंग लिस्ट असलेली तिकिट देण्यात येते. परंतु तुम्हाला खरच कन्फर्म तिकिट हवी असल्यास 'या' सोप्या स्टेप्सबाबत अधिक जाणून घ्या.
>>रेल्वे स्थानकात तिकिट काउंटवर जाऊन आता तिकिट काढणे जुने झाले असून बहुतांश जण ऑनलाईन पद्धतीने ते बुक करतात. जर तुम्ही आयरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यास तेथून तुम्हाला तिकिट बुकिंग करता येणार आहे. तसेच काही कारणामुळे प्रवास करणे शक्य न झाल्यास तिकिट रद्द सुद्धा करता येते. ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला त्याबाबत अधिक माहिती मिळते.
>>जर तुम्ही तिकिट प्रवास करण्यापूर्वी3 महिने आधी बुकिंग करत असल्यास तुम्हाला कन्फर्म असणारी तिकिट मिळू शकते. मात्र तुम्हाला वेटिंग लिस्ट मध्ये असलेली तिकिट मिळाल्यास ती कन्फर्म होईपर्यंत वाट पहावी लागते. लक्षात असू द्या कोणत्याही ट्रेनचे कन्फर्म तिकिट प्रवासकरण्यापूर्वीच्या 120 दिवस करावी लागते. परंतु तुम्ही ऐन वेळेस तिकिट बुक करायचा विचार करत असल्यास तत्काळ तिकिटाचा पर्याय आहे.
>>तुम्ही तिकिट बुक करत असल्यास ती सोमवार ते गुरुवार दरम्यान करावी. कारण शुक्रवार, शनिवार आणि रविवारी कन्फर्म तिकिट मिळणे मुश्किल असते. कारण बहुतांश लोक विकेन्डला प्रवास करणे योग्य समजतात.
>>ज्यावेळी तुम्ही तिकिटाचे बुकिंग करता त्यावेळी त्याची PNR स्थिती तुम्ही पाहू शकता. खासकरुन प्रवासाठी खुप जण असल्यास तुम्हाल रेल्वेचे तिकिट कन्फर्म झाले आहे की नाही ते समजणे सोपे होते. मात्र तुमची वेटिंग लिस्ट मधील तिकिट सुद्धा कन्फर्म न झाल्यास तुम्ही तत्काळ तिकिट बुकिंग करु शकता.
तसेच काही ठिकाणी अशी आहेत तेथे जाण्यासाठी एका ठाराविक वेळेनुसार आणि काळानुसार रेल्वेची सोय करण्यात आलेली असते. अशा वेळी रेल्वेचे तिकिट प्रवास करण्याच्या तीन महिन्यांआधी काढणे योग्य ठरणार आहे.