भारतीय नौदलाच्या ताफ्यात 28 सप्टेंबरला दाखल होणार दुसरी पाणबुडी 'आयएनएस खंदेरी', 350 मीटर खोल समुद्रात जाऊन शत्रूची माहिती मिळणार
INS Khanderi (Photo Credits-Indian Navy)

भारतीय स्कॉर्पिन श्रेणीमधील दुसरी पाणबुडी 'आयएनएस खंदेरी' (INS Khanderi) 28 सप्टेंबरला भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या हस्ते दाखल करण्यात येणार आहे. याबाबत नौसेना दलाकडून आज माहिती देण्यात आली आहे. आयएनएस पाणबुडीमध्ये सध्याचे आत्याधुनिक सेवायंत्रणा देण्यात आली आहे. तसेच आयएनएस खंदेरी 350 मीटर खोल समुद्रात जाऊन शत्रूची माहिती मिळवू शकणार आहे. या पाणबुडीचा वेग 22 नोट्स म्हणजेच 40 किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे.

मुख्यधिकारी जी अशोक कुमार यांनी मीडियाला दिलेल्या वृत्तानुसार, आयएनएस पाणबुडीसह P17 क्षेत्रीणीत पहिल्या जलपोत आयएनएस नीलगिरीचे जलावतरण आणि एका विमानवाहक ड्राईडॉक यांचे सुद्धा उद्घाटन होणार आहे. त्याचसोबत ताफ्यात 'खंदेरी' आणि 'नीलगिरी' दाखल झाल्यास नौदलाची ताकद अधिक मजबूत होणार आहे. तसेच त्यांनी असे म्हटले आहे की, विमानवाहक ड्राईडॉक भारतातील सर्वात मोठे जहाज आयएनएस विक्रमादित्यला बंदरापर्यंत नेण्याची शक्ती त्यामध्ये आहे.

तत्पूर्वी पहिली 'आयएनएस कलवरी' (INS  Kalvari) स्कॉर्पियन पद्धतीची पाणबुडी खंदेरी डिसेंबर 2017 मध्ये भारतीय नौदलात दाखल करण्यात आली होती. असे सांगितले जात आहे की, प्रोजेक्ट 75 कार्यक्रमाअंतर्गत भारत सहा स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुडी बनवणार असून त्यामधीलत आयएनएस कलवरी आणि आयएनएस खंदेरी आहे. अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, खंदेरी पाणबुडीच्या लॉन्चिंगवेळी समुद्रात सात स्लीट फ्रिगेथ सुद्धा लॉन्च करण्यात येणार आहे.(भारताला फ्रान्स कडून मिळाले राफेल विमान, सैन्याची ताकद वाढणार)

भारतात प्रथम स्कॉर्पिनय श्रेणीतील पाणबुडी आयएनएस कलवरी 2017 मध्ये नौदलात दाखल केली होती. याची निर्मिती फ्रांन्सच्या मदतीने करण्यात आली. तर मुंबईतील माझगाव डॉकयार्ड लिमिटेड द्वारे याप्रकारच्या पाच पाबुड्यांची निर्मिती केली जात आहे. या सर्व पाणबुड्या 2020 पर्यंत नौदलात दाखल करण्यात याव्यात याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.