भारताला फ्रान्स कडून मिळाले राफेल विमान, सैन्याची ताकद वाढणार
File image of Rafale fighter jet (Photo Credits: dassaultaviation.com)

भारतीय वायुसेनेची (Indian Airforce) ताकद आता अधिक वाढणार असून फ्रान्सकडून (France) लढाऊ विमान राफेल भारताकडे सुपूर्द करण्यात आले आहे. राफेन विमान वनवणारी कंपनी दसॉ एविएशनकडून पहिले राफेल भारतीय वायुदलाला देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. राफेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप करीत विरोधकांनी मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली होती. राफेलचा मुद्दा देशभर गाजला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राफेलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

डेप्युटी एअर फोर्सचे चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या उपस्थितीत राफेल विमान स्वीकारण्यात आल्याची माहिती आहे. व्ही. आर. चौधरी यांनी राफेल विमान स्वीकारल्यानंतर त्याची चाचणी सुद्धा करण्यात आली. राफेल या लढाऊ विमानाची मारक क्षमता पाकिस्तानच्या लढाऊ विमानापेक्षा अधिक आहे. त्याचसोबत SCALP मधून शेजारच्या राष्ट्रांच्या संपूर्ण भागावर या विमानाच्या सहाय्याने मारा करता येऊ शकणार आहे.(Rafale in Lok Sabha: ' 2019 मध्ये भारताला मिळणार राफेल विमान', संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांचा काँग्रेसवर पलटवर)

वायुदलाला खूप वर्षापासून राफेल विमानाची उत्सुकता होती. राफेल विमानाची चाचणी करण्यासाठी तसेच त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय पायलट फ्रान्समध्ये कमीत कमी दीड हजार तास उडवतील. एससीएएलपी क्षेपणास्त्र अत्याधुनिक असून 300 किलोमीटरपर्यंत जमिनीवरून मारा करू शकते. प्रशिक्षण आणि चाचणी पूर्ण झाल्यानंतर राफेल वायुदलाच्या अंबाला बेसमध्ये आणण्यात येणार आहे.