Petrol-Diesel | (Photo Credit: ANI)

देशातील इंधन दर (Petrol, Diesel Price Today) पुन्हा वाढले आहेत. आज (21 ऑक्टोबर) पेट्रोल डिझेल दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेल दरा मोठी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्र्रोल, डिझेल प्रति लिटर 35 पैशांनी वाढून अनुक्रमे 106.54 रुपये आणि 95.27 रुपये इतके झाले आहेत. मुंबईतही हे दर प्रति लिटर 35 पैशांनी वाढून अनुक्रमे 107.12 रुपये आणि 98.38 रुपये इतके झाले आहेत, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) ने वाढत्या इंधन दराबाबत माहिती दिली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एअरलाइन्सला एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF or jet fuel) ज्या किमतीला विकले जाते त्याहीपेक्षा अधिक दराने देशात रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचे इंधन विकले जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये (ATF costs in Delhi) जेट इंधन 79,020.16 रुपये प्रति किलो लीटर म्हणजेच 79 प्रति लिटर दराने विकले जात असल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून)

ट्विट

मुंबईत पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 103.26 रुपये पर लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल103.61 रुपये तर डिझेल 99.59 रुपये दराने विकले जात आहे. सरकारी तेल शुद्धीकरण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. मूल्यवर्धित कर किंवा व्हॅटमुळे इंधनाचे दर राज्यभर बदलतात.