Indian Economy Growth | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) ही जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. काल काही वृत्तसंस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियनचा ($4 Trillion) टप्पा ओलांडल्याचं वृत्त दिले आहे. मात्र वास्तवात अद्याप हा टप्पा पार झालेला नाही. भारत या महत्त्वाच्या टप्प्याच्या उंबरठ्यावर सध्या उभा आहे. रविवारी सोशल मीडीयात काही स्क्रिनशॉर्ट्स वायरल झाले होते. त्यामध्ये भारताने 4 ट्रिलियनचा टप्पा पार केल्याचा दावा करण्यात आला होता. त्याच्या आधारे अनेक मीडीया एजंसीने त्याबाबतचे वृत्त दिले होते.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये nominal GDP किंवा GDP at current prices हा Rs 272.41 लाख प्रति करोड इतका सांगण्यात आला आहे. त्यानुसार वाढीचा दर 16.1% आहे. डॉलर्समध्ये तो 3.3 ट्रिलियन आहे. बजेट मध्ये FY24 चा nominal GDP Rs 301.75 लाख प्रति करोड आहे. 10.5 %वाढीचा दर अपेक्षित होता. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था $3.6 trillion आहे.

जयराम रमेश यांची X वर पोस्ट

भारत सरकारने देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. सरकारच्या ध्येयाच्या दिशेने ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच सांगितले होते की, 2027 पर्यंत भारत फक्त जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार नाही, तर भारताचा जीडीपी $5 ट्रिलियन पेक्षा जास्त होईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही असाच अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला भारताने ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकले आणि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. भारताचा आर्थिक विकास दर आता पाहिल्यास, इतर कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत तो सर्वाधिक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 7.8 टक्के होता. त्यापूर्वी, गेल्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 7.2 टक्के दराने वाढली होती. (हेही वाचा: Deepfakes व्हिडिओवर मोदी सरकारची कठोर अॅक्शन; Ashwini Vaishnav यांनी दिला सोशल मीडिया कंपन्यांना इशारा)

रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 6.5 टक्के राहणार आहे. भारताची अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के दराने, तिसऱ्या तिमाहीत 6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.7 टक्के दराने वाढणार आहे. तर आयएमएफच्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था 2023 आणि 2024 मध्ये 6.3 टक्के दराने वाढेल. याचाच अर्थ भारत ही आगामी काळातही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार आहे.