प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: फाइल फोटो)

अनेक दशकांपासून भारतात स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. भारतात मुलींपेक्षा मुलांना अधिक प्राध्यांन्य दिलं जातं. मुलींना जन्म दिल्यानंतर त्यांची हत्या केली जाते किंवा गर्भधारणे दरम्यार लिंग चाचणी करु त्यांना मारण्यात येत असे प्रकार देशात मोठ्या प्रमाणावर घडायचे. पण बेटी बचावो बेटी पढावो या मोहिमेच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येवर चांगलाच चाप बसल्याची माहिती मिळत आहे. 2020 पासूनचा महिला बालमृत्यू दराचा डेटा बघता काही महत्वाची माहिती पुढे आली आहे. म्हणजे देशातील महिला बालमृत्यू दरात मोठी घसरण झाली असून  आता बालमृत्यूचे प्रमाण मुले आणि मुली दोघांमध्ये समान झाले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्वीट करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. देशातील शैक्षणीक संस्था आणि आरोग्य सेवांना याबाबत श्रेय देत इराणी यांनी भारतीयांचं कौतुक केलं आहे.

 

देशातील 13 राज्यांमध्ये मुलींच्या बालमृत्यूचे प्रमाण मुलांच्या मृत्यूच्या समान झाले असले तरी अजूनही 16 राज्ये अशी आहेत जिथे मुलींचे महिला मृत्यू दराचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. तरी हे अंतर ही लवकर कमी होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. बालमृत्यू दर म्हणजे प्रति 1,000 जन्मांमागे नवजात मृत्यूची संख्या. ग्रामीण भारतात मुला-मुलींच्या बालमृत्यू दरातील तफावत नक्कीच कमी झाली आहे, पण मुलींचा मृत्यू दर मात्र जैसे थे आहे. शहरी भारतात 2011 मध्ये मुले आणि मुलांमधील बालमृत्य दरातील फरक खूपच जास्त होता. पण त्या तुलनेत 2020 मध्ये मुलींचा मृत्यू दर मुलांच्या मृत्यू दराच्या तुलनेत खुप कमी झाला आहे. (हे ही वाचा:- National Icon: अभिनेते Pankaj Tripathi ठरले 'नॅशनल आयकॉन'; भारतीय निवडणूक आयोगाची घोषणा)

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत देशातील नागरीकांचे कौतुक केले आहे. तर देशातील नारी शक्तीला बळकट करण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे अशी प्रतिक्रीया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. यूनायटेड नेशनच्या डेटा प्रमाणे 20 पेक्षा जास्त बालक मृत्यू दराच्या  देशांच्या यादीत भारत हा एकमेव देश होता जिथे मुले आणि मुलींमध्ये बालमृत्यू दर जवळजवळ समान आहे.