Photo Credit: Pixabay

Maharashtra Shocker: महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबारमध्ये भीषण अपघात झाला. येथे 16 जुलै रोजी पती-पत्नी आपल्या 6 महिन्यांच्या बाळाला घेऊन दुचाकीवरून कुठेतरी जात होते. दरम्यान, वाटेत असलेल्या नाल्यातून जात असताना त्यांचा तोल गेला. त्यामुळे बाळ पाण्यात पडला. पाण्यात पडताच जोरदार प्रवाहात पती, पत्नी व मूल वाहून गेले. पती-पत्नी कसेतरी वाचले. मात्र जोरदार प्रवाहात मूल वाहून गेले. ज्याचा मृतदेह घटनेच्या दुसऱ्या दिवशी सापडला.

अपघाताबाबत नंदुरबार तहसीलदार दीपक गिरासे म्हणाले की, काल रात्री ही घटना घडली. रात्री 11 वाजता मनोज ठाकरे पत्नी आणि 6 महिन्याच्या मुलाला घेऊन शहादाकडे जात होते. मोटारसायकलवरून जाताना त्यांनी नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र नाल्यात वाहणाऱ्या जोरदार प्रवाहाने बाळ वाहून गेले. अपघातानंतर पती पत्नी जीव वाचवण्यात यशस्वी झाले. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांचे मूल पाण्यात वाहून गेले.

पाहा व्हिडीओ: 

#WATCH | Nandurbar, Maharashtra: A 6-month-old infant, travelling with his parents, was washed away in swift currents of an overflowing nallah on 16th July. His body was recovered on 17th July.

Nandurbar Tahsildar Dipak Girase says, "At 11 pm last night, Manoj Thackeray, his… pic.twitter.com/VkTZEpC9cY

— ANI (@ANI) July 18, 2024

६ महिन्याचे बाळ पाण्यात बुडाले

तहसीलदार गिरासे यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच मुलाचा मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. बाळाचा मृतदेह 17 जुलै रोजी कालव्यापासून काही अंतरावर सापडला होता.