Coronavirus| Representational Image| (Photo Credits: PTI)

भारतामध्ये आज (15 जून) सलग तिसर्‍या दिवशी 11 हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण भारतामध्ये वाढले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासामध्ये कोरोनाची लागण झालेले 11,502 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर देशात 325 जणांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. दरम्यान सध्या देशात 153106 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण असून 169798 जणांवर उपचार झाले आहेत. तर 9520 जणांची कोरोना विरूद्धची लढाई अयशस्वी ठरल्याने त्यांचा जीव गेला आहे. त्यामुळे देशात एकूण कोव्हिड 19 ची लागण झालेल्यांचा आकडा  332424 वर पोहचला आहे.  दरम्यान भारताचा कोव्हिड 19 या आजारातील रिकव्हरी रेट 50% पेक्षा अधिक आहे. Community Transmission म्हणजे नेमकं काय? भारतामध्ये वाढणारी COVID-19 ची रूग्ण म्हणजे खरंच देशाचा Community Spread च्या टप्प्यात प्रवेश झाला का? पहा राज्य सरकार, केंद्र सरकारची भूमिका.

भारतामध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन 24 मार्चपासून जाहीर केला होता. सध्या त्याचा 5वा टप्पा आणि अनलॉकचा पहिला टप्पा 30 जून पर्यंत आहे. याकाळात आता संचारबंदीच्या नियामांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे सुरू झालेल्या वर्दळीमुळे कोरोनाचे अधिक रूग्ण समोर येत आहेत. मात्र हा आजार उपचाराने बरा होतो त्यामुळे लक्षणं लपवू नका काळजी घ्या असं आवाहन आरोग्य मंत्रालय आणि सरकारकडून करण्यात आलं आहे. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर.

ANI Tweet

भारतामध्ये अद्याप कोरोना व्हायरसमुळे पसरणार्‍या कोव्हिड 19 या आजारावर लस नाही. कोणतेच ठोस औषध नाही. त्यामुळे जगभरात लस शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जगभरात विविध ठिकाणी संधोधकांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाददेखील मिळत आहेत. मात्र ठोस औषध आणि लस येण्यासाठीअजूनही काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातूनच या आजाराचा संसर्ग लांब ठेवण्याचं आवाहन आरोग्य संस्थांकडून करण्यात आलं आहे.

सध्या 3 लाख 32 हजारांपेक्षा अधिक कोरोना रूग्ण असलेल्या भारताचा जगाच्या क्रमवारीमध्ये चौथा क्रमांक लागतो. अमेरिका, ब्राझिल, रशियानंतर भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. अशी माहिती worldometers.info या वेबसाईटने दिली आहे. सध्या जगात कोरोनाबाधितांचा आकडा 7,990,151 वर पोहचला आहे. तर 435,496 जणांचा जीव गेला आहे.