Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या (Coronavirus) संख्येत झपाट्याने वाढ झाली असून हा आकडा 1 लाखाच्या वर पोहोचला आहे. राज्यात काल (14 जून) दिवसभरात 3,390 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 7 हजार 958 पैकी 50 हजार 978 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी पाहता लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन योग्य ती काळजी घ्यावी अशी असे आवाहन राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत असून मुंबईतील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 58 हजार 135 वर पोहचली आहे. यापैकी 2 हजार 190 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 26,986 जणांना कोरोनावर मात केली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus: चिंताजनक! अंधेरी-जोगेश्वरी कोरोनाचे नवे हॉटस्पॉट; एका दिवसात 166 नवे रुग्णांची नोंद

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी( 14 जून-15 जून)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 58226 2182 26986
ठाणे 18080 434 6871
पुणे 12184 480 6750
औरंगाबाद 2668 135 1455
पालघर 2326 50 714
नाशिक 1934 105 1178
रायगड 1868 64 1163
सोलापूर 1820 131 676
जळगाव 1702 131 668
अकोला 1021 42 568
नागपूर 1013 12 598
सातारा 741 28 436
कोल्हापूर 694 8 532
धुळे 393 26 223
रत्नागिरी 392 16 276
अमरावती 344 21 243
जालना 272 6 159
अहमदनगर 239 9 166
हिंगोली 239 1 187
नांदेड 235 10 151
सांगली 225 7 120
यवतमाळ 181 3 136
लातूर 176 8 120
सिंधुदुर्ग 150 0 78
उस्मानाबाद 146 5 113
बुलढाणा 125 3 73
परभणी 82 3 69
अन्य राज्ये 81 20 0
बीड 75 2 49
गोंदिया 70 0 69
वाशिम 49 2 6
भंडारा 49 0 41
गडचिरोली 49 1 39
नंदुरबार 48 4 30
चंद्रपूर 47 0 27
वर्धा 14 1 8
एकूण 107958 3950 50978

भारतात कोरोना संक्रमितांची COVID-19 Positive) संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात या संख्येने अक्षरश: कळस गाठला आहे. 11,929 नव्या रुग्णांसह देशात (India) कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,20,922 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 311 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांची एकूण संख्या 9195 वर पोहोचली आहे.