Indian Railway: एखाद्या प्रवासाला जाण्यापूर्वी आपण रेल्वेचे आपल्याला कंन्फर्म तिकिट मिळावे यासाठी धडपड करत असतो. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणताही त्रास किंवा समस्या उद्भवू नये म्हणून लोक कंन्फर्म तिकिट मिळण्याची प्रतिक्षा करतात. मात्र जर तुमचे रेल्वेचे कंन्फर्म तिकिट हरवले तर आपण चिंता व्यक्त करतो. आपल्या एका लहान चुकीमुळे तिकिट हरवल्याने प्रवास कसा करायचा हा प्रश्न उद्भवतो. मात्र या समस्येवर साधा आणि सोप्पा तोडगा आहे. त्यामुळे जरी तुमचे कंन्फर्म तिकिट हरवले तरीही चिंता करण्याची काहीच गरज नाही.
जेव्हा तुमचे कंन्फर्म तिकिट हरवले जाते त्यासाठी भारतीय रेल्वेकडून एक नियम काढण्यात आला आहे. त्यानुसार तुम्हाला फक्त काही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख बाब म्हणजे तुम्ही तिकिट काउंटवरुन घेतले आहे की ई-तिकिट आहे. नेहमीच आपले ओळखपत्र सोबत ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. पण हे सुद्धा तुमच्या सोबत नसेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला तोडगा काढता येणार आहे.(e-Aadhaar Card आता कधीही आणि कुठेही डाऊनलोड करण्याची सोय; UIDAI ने शेअर केली 'ही' डिरेक्ट लिंक)
जर तुम्ही काही महिन्यांपूर्वी तिकिट काढली असून ती हरवण्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर चिंता करु नका. त्याचसोबत आयडी प्रुफ जरी नसेल तर यासाठी सुद्धा एक नियम आहे. त्यानुसार रेल्वेने अधिकार दिला आहे की, त्या प्रवासासाठी दंड तिकिट निरिक्षकाला देऊन त्याच बर्थच्या माध्यमातून प्रवास करु शकता. टीटी तुम्हाला दंडासह एक रिप्सिप्ट देऊन तुम्हाला सीट मिळवून देईल.(बँकींग क्षेत्रासह दैनंदिन जीवनातील वस्तूंमध्ये 1 जुलै पासून झाले 'हे' मोठे बदल; वाचा सविस्तर)
मात्र तुम्ही आरक्षण काउंटरच्या खिडकीवरुन तिकिट घेतले असल्यास आणि ते हरविले तरीही त्यावर उपाय आहे. त्यानुसार चार्ट तयार होण्यापूर्वी एक लेखी अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे. हा अर्ज मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाला द्यावा लागणार आहे. पर्यवेक्षक तुम्हाला शयनयान श्रेणीसाठी 50 रुपये आणि एसी क्लाससाठी 100 रुपये दंड देऊन ड्युप्लिकेट तिकिट देणार आहे. पण चार्ट तयार झाल्यानंतर तुम्ही ही प्रक्रिया करत असाल तर त्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. यासाठी तुम्हाला 50 टक्के भाडे द्यावे लागते.