पंजाबमधील भारतीय स्थलांतरितांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भारतीय कॅनेडीयन गुन्हेगारी सिंडिकेट (Canadian Crime Syndicate) भारतात खालिस्तान चळवळीला (Khalistan Movement) पुन्हा जोर देण्याच्या प्रत्नात आहेत. त्यासाठी सिख फॉर जस्टिस (SFJ) चे फुटीरतावादी तशा विचारांच्या लोकांना मदत करत आहेत. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या एका गोपनीय अहवालातून ही माहिती पुढे आली असल्याचे विशेष वृत्त आयएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे. या अहवालात अंमली पदार्थांची तस्करी आणि कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया राज्याबाहेर चालवल्या जाणाऱ्या धालीवाल आणि ग्रेवाल गिरोह यांसारख्या गुन्हेगारी सिंडिकेट एसएफजे नेता गुरपतवंत सिंह पन्नू आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधीत आहे.
धालीवाल आणि ग्रेवाल गिरोहने एका वॅंक्यूवर आधारीत कुख्यात माफिया सिंडिकेट 'ब्रदर्स कीपर्स'ची स्थापना केली आहे. ड्रग तस्करी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि बंदूक चालवणे याशिवाय ब्रदर्स कीपर्स एसएफजे नेता आणि खलिस्तान चळवळीशी संबंधित लोकांनाही फंड देतात. अहवालात म्हटले आहे की, बेकायदेशीररित्या संपत्ती जमा करणे, कट्टर धार्मिकतावादी शिख नेता गुरपतवंत सिंह पन्न याने अनेक खलिस्तानी गटांना एकाच छताखाली आणण्याचा कट रचला आहे. त्यासाठी तो प्रयत्नही करत आहे. त्यासाठी त्याने रविवारी (7 जून 2020) एक व्हिडिओ कॉन्फरन्सींगही आयोजित केली होती. ज्यात त्याने भाषण केले.
खालिस्तान समर्थक अमेरिकास्थित एसएफजे गटावर केंद्र सरकारने 2019 मध्ये भारत विरोधी कारवायांवर निर्बंध घातले होते. एसएफजेचा पाकिस्तानी संघटनांशीही संबंध आह. खलिस्तानच्या समर्थनार्थ शिख समुदायाकडून जनमत तयार करण्यासाठी जोर दिला जात आहे. भारतातही एसएफजेच्या काही प्रमुख म्होरक्यांची ओळख पटवण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एक डझनहून अधिक प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत. यातील काही प्रकरणांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे. त्याचा तपास एनआयई करत आहे. आयएनएस द्वारा प्राप्त वृत्तानुसार या गोपनीय अहवालात म्हटले आह की, जे कनडाई सिंडिकेट्स पैसा जमा करत आहे तो हवालाच्या माध्यमातून पंजाब आणि उत्तर प्रदेश येथील तराई परिसरात आपल्या कार्यकर्त्यांना पाठवत आहे. (हेही वाचा, Mahatma Gandhi Statue Desecration: महात्मा गांधींच्या पुतळ्याची Washington मध्ये विटंबना; अमेरिकेचे राजदूत Ken Juster यांनी भारतीयांची मागितली जाहीर माफी)
भारतीय वंशाचे कॅनेडीयन गुन्हेगार आणि अमेरिका आणि कॅनडामधील खालिस्तान समर्थक शिख नेते यांच्यातील साठंलोठं हे काही नवे नाही. या आधीही एक प्रमुख शिख राजकीय नेता ड्रग किंगपिन रणजीत सिंह चीमा यांच्यावर या संबंधाचा आरोप झाला आहे. चीमा यांची ओळख 2000 च्या सुरुवातीला कॅनडा येथून कोकेन तस्करीतील एक मोठा दलाल म्हणून करण्यात आली होती. या शिवाय 1990 पासून 2012 या काळात कॅनडातून एक डजनपेक्षाही अधिक हत्यांमध्ये चीमा आणि मारला गेलेल्या गँगस्टर भूपिंदर सिंह सोहल यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
कॅनेडीयन संसद सदस्य जगमीत सिंह धालीवाल यांच्याबाबत एक लोकचर्चीत गोष्ट अशीही सांगितली जाते की, त्याला खालिस्तानसाठी निधी जमा करणारा नेता म्हणूनही ओळखले जाते. भारतीय स्थलांतरीत आई-वडीलांपोठी जन्माला आलेले जगमीत सिंह याने भारतीय संस्थांचे लक्ष तेव्हा वेधून घेतले जेव्हा त्याने 2013 मध्ये ओंटारियो येथे खालिस्तान समर्थक लोकांचा एक मेळावा आयोजित केला होता. ज्याचा उद्देश होता भारताची प्रतिमा डागाळणे.
दरम्यान,2013 नंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2015 मध्ये एनडीपी सदस्याच्या रुपात जगमीत सिंह सॅन फ्रान्सीस्को येथे एका खलिस्तान समर्थक रॅलित दिसला होता. मधल्या काळात जगमीत सिंह याने कुख्यात दहशतवादी नेता जनरल सिंह भिंद्रनवाले याचेही कोतुक केले होते. भिंद्रनवाले हा 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये मारला गेला.