Monkeypox Virus : मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर, विमानतळ आणि सीमेवर वाढवली सतर्कता

जगभरात मंकीपॉक्स आजाराचा धोका लक्षात घेता देशात केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. मंकीपॉक्सची जगभरातील वाढती रूग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने सीमा भागात आणि सर्व बंदरे, विमानतळांवर अलर्ट जारी केला आहे.

Monkeypox Virus : मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर, विमानतळ आणि सीमेवर वाढवली सतर्कता
Photo Credit- X

Monkeypox Virus: जगभरात मंकीपॉक्स आजाराचा धोका लक्षात ( (monkeypox virus case))घेता देशात केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. मंकीपॉक्सची जगभरातील वाढती रूग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने सीमा भागात आणि सर्व बंदरे, विमानतळांवर अलर्ट जारी केला आहे. भारताशेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्ये मंकीफॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. बांगलादेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा:Monkeypox Virus: पाकिस्तानमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळल्यानंतर भारतातही सतर्कता वाढली; विमानतळांवर तपासणीला सुरुवात )

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स आफ्रिकेन देशामध्ये पसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या आजारावर त्वरीत उपचार करण्यासाठी चाचणी प्रयोगशाळा तयार असल्याची खात्री करण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या देशातील 32 प्रयोगशाळा मंकीपॉक्सची चाचणीसाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत.यावेळी विषाणू अधिक विषारी आणि संसर्गजन्य असल्याची माहिती मिळतेय. (हेही वाचा: Monkeypox Virus: 20 देशांमध्ये पोहोचला मंकीपॉक्स विषाणू, 200 प्रकरणांची पुष्टी; WHO ने जारी केलेले निवेदन)

भारतात अद्याप मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही, पण खबरदारी म्हणून केंद्र सरकारने सर्व तयारी केलीय. आफ्रिकेतून उद्भवलेला धोकादायक एमपॉक्स विषाणू आपल्या शेजारील पाकिस्तानामध्ये पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर एमपीओएक्सची सद्यस्थिती लक्षात घेता भारत सरकार सतर्कतेच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बांगलादेश आणि पाकिस्तान विमानतळ, बंदरे आणि सीमेवरील अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर रूग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यास रूग्णालयांना सांगण्यात आलंय.

आरोग्य मंत्रालयाने दिल्लीतील राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि लेडी हार्डिंज या तीन मोठ्या केंद्रीय रुग्णालयांमध्ये नोडल सेंटर तयार केलंय. मंकिपॉक्स रुग्णांवर उपचार आणि काळजी घेण्यासाठी या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेत. केंद्राने सर्व राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील रुग्णालयांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).