Biggest Train Accidents In India: भारतातील मोठे रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले
Balasore Train Accident | (Photo Credits: ANI/ Twitter)

बंगळुरु-हावडा एक्स्प्रेस (Bengaluru-Howrah Express) आणि शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस ( Shalimar-Chennai Coromandel Express) या रेल्वेगाड्यांना झालेल्या अपघातामुळे अवघा देश हादरुन गेला आहे. या अपघातातील मृतांती संख्या 238 वर पोहोचली आहे. तर जखमींची संख्या 900 हून अधिक आहे. या अपघाताबद्दल देशभरात दु:ख आणि हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, भारतात आतापर्यंत झालेल्या मोठ्या रेल्वे अपघातांचीही चर्चा यानिमित्ताने केली आहेत. आमच्या वाचकांसाठी आतापर्यंत भारतात झालेल्या मोठ्या रेल्वे अपघघातांबाबत ही काही माहिती. खालील माहितीत दिलेली आकडेवारी वृत्तसंस्था एएनआयच्या संकेतस्थळावरुन घेण्यात आली आहे.

जून 1981 मध्ये झालेला अपघात आजही ज्येष्ठ लोकांच्या अंगावर शहारा आणतो. 6 जून रोजी झालेल्या या अपघातात 300 प्रवाशांचे प्राण गेले होते. बागमती नदी पूलावरुन जाताना अवघी ट्रेनच रुळावरुन कोसळल्याने हा अपघात घडला होता. (हेही वाचा, Train Accident In India: 1981 मध्ये बिहारमध्ये झाला होता देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात; नदीत पडून 800 प्रवाशांना गमवावा लागला होता जीव)

ऑगस्ट 1995 मध्ये घडलेह्या अपघातानेही भारतासह जगाचे लक्ष वेधून घेतले. 20 ऑगस्ट 1995 रोजी झालेल्या या अपघाता 400 नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. हा अपघात फिरोजाबाद रेल्वे स्थानकाजवळ घडला. परुषोत्तम एक्सप्रेसने कालिंदी एक्सप्रेसला दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडला होता.

नोव्हेंबर 1998 मध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने 212 प्रवाशांचा बळी गेला. 26 नोव्हेंबर 1998 रोजी हा अपघात झाला होता. जम्मू तावी-सियालदह एक्सप्रेस खन्ना येथे फ्रंटियर गोल्डन टेंपल मेल धडकली. फ्रंटियर गोल्डन टेंपल मेल रुळावरुन डबे घसरल्याने आगोदरच अपघातग्रस्त झाली होती. त्यातच तावी-सियालदह एक्सप्रेसने धडक दिली. ज्यामुळे मोठा अपघात घडला. (हेही वाचा, Odisha Train Accident: ओडिशा येथील रेल्वे अपघातात 237 ठार, 900 हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची भीती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बालासोरला रवाना)

ऑगस्ट 1999 मध्येही झालेल्या रेल्वे अपघातात 285 नागरिक ठार झाले होते. हा अपघात 2 ऑगस्ट रोजी घडला होता. ब्रह्मपुत्रा मेल उत्तर सीमा रेल्वेच्या कटिहार विभागातील गैसल स्टेशनवर थांबलेल्या अवध आसाम एक्सप्रेसला धडकल्याने हा अपघात घडला होता.

सप्टेंबर 2002 मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 140 प्रवाशांनी आपले प्राण गमावेल. हा अपघात 9 सप्टेंबर 2002 रोजी घडला. देहरी-ऑन-सोन स्थानकांदरम्यानच्या पुलावर हावडा राजधानी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रफीगंज ट्रेनचे दोन डबे नदीत कोसळले आणि हा अपघात घडला.

जून 2023 मध्ये म्हणजेच काल (2 जून) रात्री झालेल्या अपघाताती 238 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. धक्कादायक म्हणजे हा आकडा आणखीही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात 900 नागरिक जखमी झाले आहेत. बंगळुरु-हावडा एक्स्प्रेस (Bengaluru-Howrah Express) आणि शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस ( Shalimar-Chennai Coromandel Express) या रेल्वेगाड्यां एकमेकांवर आदळल्याने हा धक्कादाय अपघात घडला.

दरम्यान, ओडिशा राज्यात बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ट्रेनला ( Bengaluru-Howrah Express) भीषण अपघात घडला. एकाच वेळी तीन ट्रेन एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. रेल्वेने अधिकृतपणे केलेल्या निवेदनात आतापर्यंत 238 नागरिकांचा या घटनेत मृत्यू झाला असून 900 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.