Train Accident In India: ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी एक भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला, ज्यामध्ये आतापर्यंत 237 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. याआधीही भारतात अनेक भीषण अपघात घडले असून त्यात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना 1981 मध्ये बिहारमधील सहरसाजवळील बदला-धामारा घाटादरम्यान बागमती नदीवर घडली होती. या अपघातात प्रवाशांसह रेल्वेच्या 9 बोगी पाण्यात बुडाल्या.
6 जून 1981 रोजी बिहारमधील मानसी-सहरसा रेल्वे मार्गावर देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघात झाला. बदला आणि धामारा घाट स्थानकादरम्यान मालगाडीचे 9 डबे बागमती नदीत पडले, ज्यात सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाला. एवढी वर्षे उलटून गेली तरी ही घटना आठवून तेथील लोक हादरतात. बदला घाटातून गाडी निघाली आणि पुढचे स्थानक धामारा घाट असताना दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला, मात्र इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वीच बागमती नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. (हही वाचा - Odisha Train Accident: ओडिशा येथील रेल्वे अपघातात 237 ठार, 900 हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची भीती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बालासोरला रवाना)
या रेल्वे अपघाताला भारतातील सर्वात भीषण आणि जगातील दुसरा सर्वात भीषण रेल्वे अपघात म्हटले जाते. आजपर्यंत या अपघातामागील नेमक कारण समजू शकलेलं नाही. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस पडत होता आणि संपूर्ण ट्रेनच्या खिडक्या बंद होत्या, त्यामुळे ब्रेक लावल्यावर ट्रेनचा दाब वाढला आणि संपूर्ण ट्रेन रुळावरून घसरून नदीत गेली. असा एक अंदाज काढला गेला होता. तसेच म्हशींचा संपूर्ण कळप रुळांवर आला होता, त्यामुळे चालकाने ब्रेक दाबला आणि ट्रेन नदीत पडली, असंही म्हटलं गेले. या अपघाताचं काहीही कारण असो. या दुर्घटनेची आठवण आल्यानंतर सर्वांनाच्या अंगावर शहारे येतात.
दरम्यान, 26 नोव्हेंबर 1998 रोजी, जम्मू तवी-सियालदह एक्सप्रेस पंजाबमधील खन्ना येथे फ्रंटियर गोल्डन टेंपल मेलच्या रुळावरून घसरलेल्या तीन डब्यांशी धडकली आणि यात 212 लोकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय 2 ऑगस्ट 1999 रोजी गॅसल ट्रेनचा अपघात झाला होता, ज्यामध्ये ब्रह्मपुत्रा मेलची उत्तर आसाम रेल्वेच्या कटिहार विभागातील गासल स्टेशनवर अवध आसाम एक्स्प्रेसला टक्कर झाली होती. या अपघातात 285 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक जण जखमी झाले होते. मृतांमध्ये लष्कर, बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांचा समावेश होता.