भारतात आयात-निर्यातीने डिसेंबर महिन्यात केला रेकॉर्डब्रेक, जाणून घ्या आकडेवारी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

भारतात आयात आणि निर्यातीने डिसेंबर महिन्यात रेकॉर्डब्रेक केला आहे. त्यामुळे व्यापारात गेल्या महिन्याच्या तुलनेत तोटा झाला तरीही त्याचे अधिक परिणाम झाले नाहीत. Commerce and Industry Ministry यांच्या द्वारे गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये व्यापारात तोटा नोव्हेंबर महिन्यात 22.91 बिलियन डॉलर पेक्षा कमी होत 21.68 बिलियन डॉलर झाला. निर्यात वर्षभराच्या आधारावर 38.9 टक्क्यांनी वाढून 37.8 बिलियन डॉलर आणि आयात गेल्या वर्षाच्या तुलनेत 38.6 टक्के वाढून 59.5 बिलियन डॉलर झाला आहे. महिन्यांनुसार निर्यातीत 25.8 टक्के आणि आयातीत 12.4 टक्क्यांनी वाढ झाली.

इंडिया एक्जिम बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक प्रहलाथन अय्यर यांनी ब्लूमबर्गक्विंट यांना असे म्हटले की, सध्या व्यापार वेगाने वाढत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे पेट्रोलियम आणि रत्न-दागिन्यांची आयात. तसेच पुढे त्यांनी असे म्हटले की, एप्रिल-डिसेंबर 2021 दरम्यान नॉन-पेट्रोलियम आणि नॉन-ज्वेलरी विभागांतर्गत व्यापार तूट $35 अब्ज होती, जी हेडलाइन डेफिसिटपेक्षा खूपच जास्त आहे.(Nitin Gadkari On Road Safety And 6 Airbags Car: नितिन गडकरी यांची मोठी घोषणा, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य)

>> निर्यातीमधील प्रमुख गोष्टी

-अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वार्षिक 38.4 टक्क्यांनी वाढून $9.8 अब्ज झाली आहे.

-पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात $5.9 अब्ज इतकी झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 152 टक्क्यांनी वाढली आहे.

-हिरे आणि दागिन्यांची निर्यात वर्षभरात 16.4 टक्क्यांनी वाढून $3 अब्ज झाली आहे.

- औषधे आणि फार्मास्युटिकल्सची निर्यात $2.3 अब्ज होती, वार्षिक आधारावर 5.2 टक्के वाढ.

>>निर्यातीतील प्रमुख गोष्टी

-पेट्रोलियम, कच्चे तेल आणि उत्पादनांची आयात गैल्या वर्षाच्या तुलनेत 67.9 टक्क्यांनी वाढून 16.2 बिलियन डॉलर झाली होती.

-इलेक्ट्रॉनिक्स सामानाची आयात 6.4 अरब डॉलर होते. जे एका वर्षाच्या तुलनेत 27.6 टक्के अधिक आहे.

-सोन्याची आयात 4.7 अरब डॉलर झाली. जी एका वर्षाच्या तुलनेत 5.4 टक्के अधिक आहे.

-मशिनरी, विद्युत आणि नॉन-विद्युत आयात 3.8 बिलियन डॉलर होती. जी डिसेंबर 2020 च्या तुलनेत 20.6 टक्के अधिक आहे.

-जैविक आणि अकार्बनिक रसायनांची आयाल वर्षभराच्या आधारावर 73.1 टक्क्यांनी वाढून 3.3 बिलियन डॉलर झाली होती.

-कोळसा, कोक आणि ब्रिकेट्सचे आयात वर्षभराच्या आधारावर 2.8 अरब डॉलर वाढून 72.6 टक्के अधिक होता.