Gujarat: ड्राय गुजरातमध्ये दारू पिणाऱ्या महिलांची संख्या दुपटीने वाढली, तर पुरुषांचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटले- NFHS
Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

दारूच्या बाबतीत गुजरातमध्ये (Gujarat) अनेक निर्बंध आहेत. मात्र याच ड्राय गुजरातमध्ये अवघ्या पाच वर्षांत स्त्रियांमधील मद्यपान (Drinker) करण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे, त्याच वेळी, पुरुषांचे दारू पिण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (NFHS), 2019-20 च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. या कालावधीत एकूण 33,3433 महिला आणि 5,351 पुरुषांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 200 महिला (0.6%) आणि 310 पुरुष (5.8%) यांनी मद्यपान करत असल्याचा दावा केला.

2015 च्या एनएफएचएस सर्वेक्षणात, 68 महिला (0.3%) आणि 668 पुरुष (11.1%) यांनी मद्यपान करत असल्याची कबुली दिली होती. सन 2015 मध्ये 6,018 पुरुष आणि 22,932 महिलांचे सर्वेक्षण केले गेले होते. दोन्ही आकडेवारीची तुलना केल्यास हे दिसून येते की, 2015 मध्ये फक्त 0.1 टक्के शहरी स्त्रियांनी त्या मद्यपान करत असल्याचे सांगितले होते. मात्र 2020 च्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की हे प्रमाण वाढून 0.3 टक्के झाले आहे.

2015 मध्ये पुरुषांची दारू पिण्याची प्रकरणे 10.6 टक्के होती, तर 2020 मध्ये ती घटून 6.6 टक्क्यांवर गेली आहेत. 2015 मध्ये ग्रामीण भागात मद्यपान करणार्‍या महिलांचे प्रमाण 0.4 टक्क्यांवरून 2020 मध्ये ते 0.8 टक्के झाले आहे. 2015 मध्ये मद्यपान करणाऱ्या पुरुषांची संख्या 11.4 टक्के होती, ती 2020 मध्ये घटून 6.8 टक्क्यांवर आली आहे. (हेही वाचा: Air India महिला वैमानिकांनी रचला इतिहास; उत्तर ध्रुवावरून उड्डाण करून जगातील सर्वात लांब फ्लाईट अमेरिकेवरून पोहोचली बंगळूरूला)

समाजशास्त्रज्ञ गौरांग जानी म्हणतात की, राज्यातील बर्‍याच समुदायांमध्ये मद्यपान करण्याची मुळे खोलवर रुजली आहेत. अशा समुदायांमध्ये ही प्रथा आहे, जिथे पुरुष व स्त्रिया एकत्र बसून खास प्रसंगी मद्यपान करतात. आमचा आदिवासी समुदाय हे याचे एक उदाहरण आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली, परंतु ही संख्या कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात दारू पिणे हा गुन्हा असल्याने अनेक लोक दारू पीत असल्याचे लपवतात.