भारतीय महिला अनेक गोष्टींद्वारे जगभरात आपल्या देशाचा अभिमान वाढवत आहेत. आता भारतीय महिला वैमानिकांनीही आपली शक्ती दाखवत जगाला सांगितले आहे की त्या कोणापेक्षा कमी नाहीत. एअर इंडियाच्या 4 महिला वैमानिकांनी (Air India Pilot) इतिहास घडविला आहे. एअर इंडियाच्या चार महिला वैमानिकांनी चालविलेली सर्वात मोठी थेट फ्लाईट (Longest Flight) अमेरिकेहून (US) बेंगळुरू (Bengaluru) विमानतळावर उतरली आहे. रविवारी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) इथून उड्डाण घेतलेले हे विमान उत्तर ध्रुवावरुन (North Pole) प्रवास करून सोमवारी सकाळी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळूरू येथे पोहोचले. हा प्रवास सुमारे 16 हजार किलोमीटरचा होता.
#FlyAI : Welcome Home
Capt Zoya Agarwal, Capt Papagiri Thanmei, Capt Akanksha & Capt Shivani after completing a landmark journey with touchdown @BLRAirport.
Kudos for making Air India proud.
We also congratulate passengers of AI176 for being part of this historic moment. pic.twitter.com/UFUjvvG01h
— Air India (@airindiain) January 10, 2021
ही यासाठी देखील एक मोठी गोष्ट आहे कारण उत्तर ध्रुवावरून विमाणाचे उड्डाण करणे फार अवघड आहे. त्यामुळे विमान वाहतूक कंपन्या या मार्गावर अनुभवी पायलटनाच पाठवतात. एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाईट क्रमांक एआय-176 शनिवारी रात्री साडेआठ वाजता सॅन फ्रान्सिस्को सुटले होते. शनिवारी एअर इंडिया एअरलाइन्सने सांगितले की, हे कोणत्याही भारतीय एअरलाइन्सद्वारे चालविण्यात येणारे सर्वात लांब व्यावसायिक उड्डाण असेल. वाऱ्याच्या वेगानुसार यासाठी 17 तासांहून अधिक वेळ लागेल असे वर्तवण्यात आले होते. जगाच्या विरुद्ध टोकाला असलेल्या या दोन शहरांमधील अंतर 13,993 किलोमीटर आहे आणि दोन्ही शहरांच्या वेळेत 13.5 तासांचा फरक आहे. (हेही वाचा: CSMT-Delhi सुपरफास्ट वन वे स्पेशल ट्रेन आज मध्य रेल्वेवर धावणार; इथे पहा थांबे, बुकिंग डिटेल्स)
Women lead the way.
Air India all-women crew scripts history by landing LONGEST FLIGHT from us to Bengalure, flying over north pole.
This is a world record.!!
Congratulations to all women crew for making India Proud. 🇮🇳♥ pic.twitter.com/1GdeF94OFZ
— Asjad II اسجد♛ (@iamasjadraza7) January 11, 2021
Congratulations 4-member all women pilot team of Air India @airindiain for operating longest direct flight from San Fransico to Bengaluru covering 16,000 kms. They also successfully handled challenge of flying over north pole. pic.twitter.com/3mNiQ46rYq
— Rajendra Darda (@RajendrajDarda) January 11, 2021
From San Francisco to Bengaluru, over the North Pole: Four women pilots of Air India create history
Bravo Bharatiya Stree Shakti. pic.twitter.com/5sgA6A3Py7
— ઠાકોર પાઠક - ठाकोर पाठक - Thaakor Pathak (@ThaakorPathak1) January 11, 2021
हे विमान उत्तर ध्रुवावरून अटलांटिक मार्गाने बेंगळुरू विमानतळावर पोहोचले आहे. कॅप्टन झोया अग्रवाल या ऐतिहासिक विमानाचे नेतृत्व करीत होती. झोयाबरोबर कॅप्टन पापागरी तन्मई, कॅप्टन शिवानी आणि कॅप्टन आकांक्षा सोनवरे होते. याबाबत एअर इंडियाने ट्विट केले आहे की, 'वेलकम होम, तुमच्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. यासह आम्ही एआय 176 च्या प्रवाशांचे अभिनंदन करतो, जे या ऐतिहासिक प्रवासाचा हिस्सा बनले.' केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनीही महिला वैमानिकांचे अभिनंदन करत ट्विट केले आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन महिला वैमानिकांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. यासह हे विमान बेन्ग्लोरे येथे पोहोचल्याचे समजताच सोशल मिडियावरही या महिला वैमानिकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.