Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

मध्य रेल्वेकडून आज (11 जानेवारी) प्रवेशाची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-दिल्ली वन वे एक स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. ही विशेष गाडी केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते दिल्ली या मार्गावर असेल. आज रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी ही ट्रेन सुटणार असून तिसर्‍या दिवशी ती दिल्लीला पोहचणार आहे. 02177 या नंबरची ही ट्रेन दिल्लीला तिसर्‍या दिवशी 3वाजून 30 मिनिटांनी पोहचणार आहे. सध्या या ट्रेनचं ऑनलाईन बुकिंग सुरू आहे.

मुंबई दिल्ली ट्रेनच्या या प्रवासामध्ये ही गाडी दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खांडवा, भोपाळ, बिना, झांसी, ग्वालियर, आग्रा अशा मार्गावरून जाणार आहे. irctc.co.in या वेबसाईट सह सार्‍या PRS लोकेशनवर आजपासून या स्पेशल ट्रेनचं बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. 02177 या सुपर फास्ट स्पेशल ट्रेनसाठी तिकीट शुल्क देखील विशेष दरामध्ये आहे.

मध्य रेल्वे ट्वीट

दरम्यान कोविड 19 संकटाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी सुरक्षेचे भान ठेवत आणि कोविड 19 नियमावलीचं पालन करत या ट्रेनने देखील प्रवास करण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. दरम्यान केवळ कंफर्म तिकीट असणार्‍या प्रवाशांनाच या ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.