IMF कडून भारतीय विकास दरामध्ये घट, अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी मोदी सरकारकडून होणार्‍या हल्ल्यासाठी सज्ज रहावे: पी चिदंबरम यांचा मोदी सरकार वरही हल्लाबोल
P Chidambaram | File Image | (Photo Credits: PTI)

IMF च्या चीफ़ इकोनॉमिस्ट गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांनी भारताच्या जीडीपीमध्ये होणारी घट संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकते असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भारताचा विकासदर घसरणं हे जगाला देखील नुकसानकारक आहे. दरम्यान भारताचा आर्थिक विकास दर (India's Growth Forecast) वर्ष 2019-20 यासाठी 4.8% असेल अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताची सध्याची अर्थव्यवस्था पाहता हा दर यंदा कमी करावा लागत असल्याचं आयएमएफ (IMF) कडून सांगण्यात आलं आहे. यानंतर देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्वीट करत मोदी सरकारावर हल्लाबोल केला आहे.

2019 मध्ये जागतिक विकास दर 2.9% होता. आगामी म्हणजे 2020 च्या विकासदरासाठी तो 3.3% नोंदवण्यात आला आहे. हा दर ऑक्टोबर महिन्यात 0.1% ने कमी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यावरूनच जागतिक अर्थव्यवस्थेवर भारताचा असलेला परिणाम दिसून येत आहे.  गीता गोपीनाथ यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीवरही टीका केली होती. नोटाबंदी वर टीका करणार्‍या त्या पहिल्या होत्या.  नीति आयोग उपाध्यक्ष Rajiv Kumar म्हणतात 'भारताची अर्थव्यवस्था गेल्या 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या वाईट स्थितीत'

पी. चिदंबरम यांचे ट्वीट 

अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी India Today च्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना, भाराताच्या विकासदरामध्ये होत असलेल्या घसरणीचं कारणही स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मते, गैर बॅंकींग वित्तीय क्षेत्रामध्ये असलेलं उदासीचं वातावरण तसेच ग्रामीण क्षेत्रातील उत्पन्नामध्ये घट झाल्याने त्याचा परिणाम आता भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. परिणामी देशाचा विकासदर कमी झाला आहे. दरम्यान आगामी वर्षभरासाठी हा विकासदर 4.8% असेल. मागील काही दिवसांपासून देशामध्ये सुस्त असलेली अर्थव्यवस्था आणि त्याचे परिणाम विविध स्तरांवर उमटताना दिसत आहेत.

गोपिनाथ यांच्या वर्तवलेल्या अंदाजामध्ये 2020 मध्ये विकासदर वाढण्याची शक्यता कमी असल्याची भीती व्यक्त केली आहे. अर्जेटीना, टर्की इराण प्रमाणेच आता भारत, मेक्सिको सारखे विकसनशील देशांचा विकास दर यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.