एनआरसी (NRC) आणि नागरिकता दुरुस्ती कायदा ( Citizenship (Amendment) Act, 2019) या दोन्हींना देशातून विरोध होत आहे. नागरिकता दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने संसदेत बहुमताच्या जोरावर संमत केले. त्यानंतर देशभरात त्याविरोधात रान उठले. खास करुन इशान्य भारतात सुरु झालेला हा विरोध पाहता पाहता राजधानी दिल्ली आणि देशांच्याविविध राज्यांमध्ये आणि कानाकोपऱ्यात पसरले. दरम्यान, ख्यातनाम इतिहासकार रामचंद्र गुहा (Ramachandra Guha) यांनी एनआरसी आणि सीएए या दोन्हींबाबत विचार व्यक्त करताना एक गंभीर इशारा दिला आहे. गुहा यांन म्हटले आहे की, हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रवाद ही संकल्पना आजची नाही. तर ती 200 ते 300 वर्षांपासूनची आहे. 18 19 व्या शतकात ही संकल्पना युरोपीयन राष्ट्रांकडून घेण्यात आली आहे.
रामचंद्र गुहा हे ख्यातनाम इतिहासकार म्हणून ओळखले जातात. गांधी नंतरचा भारत आणि गांधीपुर्वीचा भारत ही त्यांची दोन्ही पुस्तके प्रचंड गाजली आहेत. गुहा यांनी सीएए आणि एनआरसी बद्दल पुढे बोलताना सांगितले की, युरोपीयन राष्ट्रंमध्ये एका विशिष्ट गट, समूहाला निशाणा बनवून, एक भाषा, एक संस्कृती आणि एक नेता या विचारांना चालना देऊन राष्ट्रीय शक्ती बनविण्याचा दाव होता. मात्र, पूर्व आधुनिक इंग्लंड आणि फ्रान्स देशांमध्ये देशाच्या आधारावर इंग्रजी किंवा फ्रेंच भाषेच्या बाजूने असलेल्या लोकांनी सर्व स्थानिक भाषां संपवून टाकल्या. असे केल्यानंर एकमेकांमध्ये मठ्या प्रमाणावर तिरस्काराची भावना वाढीस लागली. उदाहरणच घ्यायचे तर फ्रान्समध्ये सर्व लोक फ्रेंच भाषा बोलत होते. सर्वजन कॅथोलीक होते आणि इंग्लंडची घृणा करत होते. भारतात विद्यमान सरकारचे मॉडेल सांगत आहे की, हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे. आम्ही सर्वांनी हिंदू असायला हवे आणि पाकिस्ताचा तिरस्कार करायला हवा. (हेही वाचा, CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे दिल्लीत जमाव बंदी लागू, बंगळुरु-मुंबईत हायअलर्ट)
कर्नाटक येथे बोलताना रामचंद्र गुहा यांनी नागरिकता दुरुस्ती विधेयकाबाबत बोलताना स्पष्ट काही म्हटले नाही मात्र आपल्या भाषणाच्या शेवटी या विषयावर आपली काही तर्क ठेवले. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या आंदोलनांचे नेतृत्व राजकीय पक्षांच्या हातात असता कामा नये. दरम्यान, रामचंद्र गुहा यांना गुरुवारी (19 डिसेंबर 2019) या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटक येथील हुबळी, कलबुर्गी, हासन, म्हैसुर आणि बेल्लारी येथे एनआरसी आणि सीएए विरोधा आंदोलन केले. या वेळी रामचंद्र गुहा यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी भारतीय दंड संहिता 144 या कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी ताब्यात घेतले.