लाल किल्ला (Photo Credits-ANI)

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशातील काही राज्यात अद्याप आंदोलने केली जात आहेत. राजधानी दिल्ली येथे या आंदोलनाचा भडका अधिक उडत असल्याने येथे कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू केली आहे. या कारणामुळे काही नागरिकांना याचा त्रास होण्यासोबत दिल्लीतील काही मेट्रो स्थानक सुद्धा बंद करण्यात आली आहेत.

डीएमआरसीने जामिया मिलिया इस्लामिया, जलोसा विहार बाग, मुनिरका , लाल किल्ला, जामा मस्जिद, चांदनी चौक आणि विश्वविद्यालय मेट्रो स्थानकातील वाहतूक बंद करण्यास भाग पाडले आहे. त्याचसोबत पटेल चौक, लोक कल्याण मार्ग, उद्योग भवन, आयटीओ, प्रगति मैदान आणि खान मार्केट येथील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे प्रवासी मेट्रो स्थानकातून आतमध्ये किंवा बाहेर जाऊ शकणार नाहीत आहे. त्याचसोबत या स्थानकांवर मेट्रो थांबण्यात येत नाही आहेत.(CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज मुंबई महाविद्यालयातील विद्यार्थी ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करणार)

ANI Tweet:

ANI Tweet:

त्याचसोबत रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना सुद्धा या परिस्थितीमुळे काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था म्हणून मथुरा रोड ते कालिंदी कुंज पर्यंत जाणारा मार्ग बंद ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील लोक नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात जोरदार आंदोलन करत आहे. यादरम्यान या आंदोलनाला हिंसेचे वळण सुद्धा लागल्याचे दिसून आले. त्याचसोबत बंगलोर येथे सुद्धा जमावबंदी लागू केली होती. मात्र आज युपी येथे ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर बंगळुरु आणि मुंबई येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार असल्यची शक्यता व्यक्त केली जात असून हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.