CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज मुंबई महाविद्यालयातील विद्यार्थी ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करणार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: IANS)

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (Citizenship Amendment Act) विरोधात आंदोलने केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर आज मुंबईच्या (Mumbai) महाविद्यालयातील विद्यार्थी या कायद्याच्या विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात (August Kranti Maidan) आंदोलनासाठी उतरणार आहेत. यामध्ये टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स आणि आयआयटी बॉम्बे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मुंब्रा येथे सुद्धा हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावत आंदोलन केले तर बांद्रो कार्टर रोड येथे कॅन्डल मार्च काढण्यात आली होती.

आज ऑगस्ट क्रांती मैदानात पार पडणाऱ्या आंदोलनात सेट झेव्हियर्स महाविद्यालयाचे जवळजवळ 300 विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. टीआयएसएसचे (TISS) फहाद अहमद यांनी असे म्हटले आहे की, आंदोलनात सहभागी होणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे. त्याचसोबत जो कोणी आंदोलनादरम्यान हिंसाचार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची थेट तक्रार पोलिसात केली जाणार आहे.(CAA Protest: सौरव गांगुली याची मुलगी सना हिने विरोधकांना दिला पाठिंबा?)

 नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ईशान्य भारतात आंदोलने सुरुच होती. त्यानंतर या आंदोलनाचे परिणाम दिल्लीत सुद्धा दिसून आले. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 15 डिसेंबरच्या रात्रीपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तसेच आंदोलकांनी विद्यापीठाजवळील भागामध्ये बसेस पेटवून दिल्या. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या परिसरात घुसत अश्रुधुराचा वापर केला. तसेच पोलीस विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत असल्याचे व्हीडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.