Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: हाहाकार माजविला असून गेल्या 24 तासांत कोरोना रुग्ण संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 7964 नवे रुग्ण आढळले असून कोविड-19 (COVID-19) बाधितांची एकूण संख्या 1,73,763 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 265 रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा 4971 वर पोहोचला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. सद्य स्थितीत देशात 86,422 रुग्णांवर उपचार सुरु असून 82,370 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत. कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता देशात लॉकडाऊन वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाचे संकट आणि त्याचे परिणाम भारतावरही स्पष्ट दिसत आहेत. भारताच्या जीडीपी (GDP) दराच्या रुपात हे परिणाम अधिक ठळक झाले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या आर्थिक वर्षात (2019-20) सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross Domestic Product) वाढीचा दर हा चौथ्या तिमाहीत घटला असून तो 3.1% इतका राहिला आहे. सरकारने पुढे म्हटले आहे की, 2019-20 मध्ये देशाचा विकारसर 4.2% इतका राहिला. जो 2018-19 मध्ये 6.1% इतका होता.

हेदेखील वाचा- पीएम नरेंद्र मोदी यांचे 10 कोटी कुटुंबांना पत्र; व्हर्च्युअल रॅलींचे आयोजन करून 'BJP' साजरी करणार Narendra Modi Government 2.0 ची वर्षपूर्ती

कोविड 19 वर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने 25 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते. परंतु जानेवारी ते मार्च या काळात जगभरातील आर्थिक यंत्रणा ठप्प राहिल्या. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2019-20 मध्ये आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज पाच टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त केला होता. तर एनएसओने यंदाही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पाच टक्के वाढीचा अंदाज वर्तविला होता. दरम्यान, कोरोना विषाणूच्या साथीमुळे जानेवारी-मार्च 2020 मध्ये चीनची अर्थव्यवस्था 6.8 टक्क्यांनी घसरली.