हरीयाणा राज्यातील तरुण योगेश काड्यान (Yogesh Kadyan) याच्याविरोधात इंटरपोलने (Interpol) 'रेड कॉर्नर' नोटीस (Interpol Red Corner Notice) बजावली आहे. धक्कादायक असे की, योगेश अवघ्या 19 वर्षांचा आहे. तो एक कुख्यात गँगस्टर असल्याची चर्चा आहे. त्याच्यावर हत्या, हत्या आणि गुन्हेगारी कारवायांसाठी कट रचल्याचा आरोप आहे. तसेच, त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यानुसार अनेक गुन्हेही दाखल आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तो सध्या भारताबाहेर पळाला आहे. सध्या तो यूएस सरकारच्या आश्रयास असल्याचे वृत्त आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा (NIA) योगेश काड्यान याचा शोध घेत आहे. एएनआयच्या रडारवर आल्यापासून तो बचावाचे सर्व प्रयत्न करत आहे. पाठिामागील काही काळापासून एनआयएने भारतातील गुन्हेगारांवर करडी नजर ठेवत कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे आणि दहशतवाद्यांचे जाळे पूरते उद्ध्वस्थ झाले आहे. तसेच, अनेक गँगस्टरच्या टोळ्या नेस्तनाबूत झाल्या आहेत. काही गँगस्टर भूमिगत होऊन लपले आहेत. काहींनी बनावस पासपोर्ट मिळवत देशाबाहेर पळ काढला आहे, असा तपास यंत्रणेचा दावा आहे. दरम्यान, काड्याने यानेदेखील अशाच प्रकारे बनावट पासपोर्ट मिळवत देशाबाहेर पळ काढल्याचा एनआयएला संशय आहे.
भारत आणि कॅनडाचे संबंध इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर ताणले गेले आहेत. अशा वेळी काड्यान भारताबाहेर पळाल्याचा प्रकार पुढे आला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आरोप केल्यानंतर, त्यांनी जे सांगितले ते विश्वसनीय पुरावे, भारतीय एजंट आणि जूनमध्ये व्हँकुव्हर उपनगरातील गुरुद्वाराबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून ठार केलेले खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांची हत्या यांच्यातील संभाव्य दुवा असल्याचा आरोप केल्यानंतर हा वाद सुरू झाला. भारताने ट्रुडो यांचे आरोप बेताल ठरवून फेटाळून लावले आहेत. दरम्यान, अमेरिकेने निज्जरच्या हत्येची सखोल चौकशी करण्याची बाजू घेतली आहे आणि आंतरराष्ट्रीय कायदा, सार्वभौमत्व आणि हस्तक्षेप न करण्याच्या तत्त्वांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
इंटरपोल, किंवा इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन ही 195 सदस्य देशांचा समावेश असलेली एक आंतर-सरकारी संस्था आहे. जी या सर्व देशांतील पोलिस दलांना त्यांच्या कृतींचे अधिक चांगले समन्वय साधण्यास मदत करते. ही संस्था सदस्य देशांना गुन्हे आणि गुन्हेगारांवरील माहिती सामायिक करण्यास आणि हाताळण्यास करण्यास सक्षम करते. काही प्रकरणांमध्ये गुन्हेगारांची आणि माहितीची देवाणघेवाण तसेच तांत्रिक आणि इतर बाबींवर सहकार्य करते. या संस्थेचे मुख्यालय ल्योन, फ्रान्समध्ये आहे, सिंगापूरमध्ये या संस्थेचे कार्यालय आहे. जगभरातील आणखी काही देशांमध्ये ही कार्यालये आहेत. भारताने जून 1956 मध्ये इंटरपोलचे सदस्यत्व स्वीकारले.