राज्यातील आर्थिक मंदीचे वातावरण पाहता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी काउंसीलची बैठक पार पडणार आहे. या बैठक काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असून त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनातील वस्तूंवर होण्याची शक्यता आहे. मात्र आजच्या बैठकीत खासकरुन लक्ष सरकारचा महसूल कशा पद्धतीने वाढेल यावर काय निर्णय घेतला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचसोबत जीएसटीच्या माध्यमातून राज्य आणि केंद्रादरम्यान पुरेसा महसूल जमा करत संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचसोबत सरकार काही वस्तूंवर 2 टक्के अस्थायी उपकर (Cess) लावण्याचा सुद्धा विचार करु शकते. ज्यामध्ये खासकरुन 5 टक्के स्लॅबमध्ये येणाऱ्या काही गोष्टी आणि सेवा यांचा समावेश आहे.
जीएसटी अंतर्गत सध्या 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्क्यांनुसार कराची वसूली केली जाते. त्याचसोबत 28 टक्के असलेल्या श्रेणीत येणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावण्यात येतो. केंद्र आणि राज्यातील अधिकाऱ्यांची मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत जीएसटीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये 5 टक्के कर वाढवून 8 टक्के आणि 12 टक्के कर वाढवून 18 टक्के करण्याचा विचार करण्यात आला आहे. तर सरकारी आकड्यांनुसार एप्रिल ते नोव्हेंबर या महिन्यात केंद्रीय जीएसटी वसूली 2019-20 च्या बजेटच्या नुसार 40 टक्के कमी झाली आहे. या काळात जीएसटी 3,28,365 रुपये होता मात्र तो 5,26,000 रुपये झाला आहे.(GST काउंसिलच्या बैठकीत दैनंदिन जीवनातील या गोष्टींवरील करात वाढ होऊ शकते)
देशात जीएसटी 2017 मध्ये लागू करण्यात आली होती. या दरम्यान अर्थमंत्रालयाने 2019-20 या कालावधीतल चार महिन्यातून एकदा 1.1 लाख करोड रुपये जीएसटी कर वसूल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचसोबत सरकारने कराची होणारी चोरी पकडण्यासाठी असे ही निर्देशन दिले आहेत की प्रामाणिक करदात्यांना त्रास दिला जाऊ नये.