गाझियाबाद: अपहरण केलेल्या मुलांची 5 ते 10 लाख रुपयांत विक्री, पोलिसांकडून 11 आरोपींना अटक
Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

गाझियाबाद मध्ये चोरीच्या घटना सर्वाधिक वाढत आहेत. पोलिसांना गेल्या काही दिवसांपासून संशय होता की, कोणतीतरी गँग यामध्ये सहभागी आहे. अशातच पोलिसांकडून संपूर्ण तयारी करत या गँगचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी फातिमा नावाच्या महिलेच्या मुलाचा शोध घेतला. या मुलाचे गँगकडून अपहरण करण्यात आले होते. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आणि त्यांनी एक टीम तयार केली. अखेर पोलिसांचे प्रयत्न यशस्वी ठरले आणि सूचना मिळाल्यानंतर लोथी ठाणे पोलिसांनी फक्त मुलांना लखनौ येथून ताब्यात घेतले. तसेच मुलांचे फोटो आणि त्यांची खरेदी विक्री करणाऱ्या गँगमधील 11 महिला-पुरुषांना अटक केली आहे. त्यानंतर या घटनेचा पर्दाफाश पोलिसांकडून करण्यात आला.

मुलांची तस्करी आणि त्यांचे अपहरण करुन त्यांची विक्री करण्याचा गँगकडून प्रयत्न केला जात होता. मात्र जेव्हा मुलाची विक्री करण्यासंबंधित काही अडथळा आला तेव्हा गँगमधील दोघांकडून मुलाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर लखनौ येथील एका दांपत्याला हे मुल साडेपाच लाखांत विक्री करण्यात आले.(Sexual Assault Case: बलात्काराचे आरोप आणि निर्दोष मुक्तता; 'तहलका' मासिकाचे संस्थापक Tarun Tejpal यांच्यासोबत काय घडले?)

खरंतर 12 मे रोजी लोनी येथे राहणाऱ्या फातिमा नावाच्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. तिने तक्रारीत असे म्हटले की, दुपारी जवळजवळ 12 वाजता एक पुरुष आणि एक महिला तिच्या घरी भाड्याने घर पाहण्यासाठी आले होते. त्यांनी बोलण्याबोलण्यात फातिमा हिला काहीतरी गुंगीचे औषध दिले आणि 15 महिन्यांच्या मुलाला घेऊन फरार झाले.(Air India Data Hack: विमानाने सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धोक्याची घंटा; पासपोर्ट, क्रेडिट कार्डसह वैयक्तिक माहिती लीक)

एसपी अमित पाठक यांनी मुलाचा शोध घेण्यासाठी एक टीम तयार केली. त्यानंतर दिल्लीतून साडेचारशे किमी दूर चोरी करण्यात आलेले मुल रमजानी याला आलोक अग्निहोत्री नावाच्या व्यक्तीकडून ताब्यात घेण्यात आले. लखनौ येथून अटक करण्यात आलेल्या आलोक अग्निहोत्री याने एक धक्कादायक खुलासा केला. त्याने पोलिसांना असे सांगितले की, लग्न झाल्यानंतर त्यांना एकही मुल झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी अश्मित आणि तिचा नवरा गुरमीत कौर यांच्याकडून साडेपाच लाखांमध्ये हे मुल खरेदी केले. अश्मित आणि गुरमीत हे दोघे दिल्लीत राहणारे आहेत.

गाझियाबाद पोलिसांच्या समोर आव्हान होते की, अश्मीत आणि गुरमीत यांच्याकडे हे मुल पोहचलेच कसे. त्यामुळे पोलिसांनी प्रथम या दोघांना अटक केली. तपासादरम्यान या दोघांनी असे म्हटले की, हे मुल वाहिदा आणि तरमीम यांनी चोरी करुन रुबिना म्हणजेच मोनिका हिले दिले होते. त्यानंतर हे मुल सरोज, प्रिती आणि ज्योति यांना दिला. नंतर हे मुल प्रभा, इंदु आणि तिचा मित्र शिवा यांच्याद्वारे अश्मित कोर आणि गुरमीत यांच्याकडे पोहचले.

तर नवजात मुल चोरी करणारे एक गँग असून ती गेल्या काही काळापासून सक्रिय आहे. पोलिसांनी आरोपींकडून 5 लाख रुपये जप्त केले आहे. अश्मित कोरा द्वारे सांगण्यात आले की, त्याचा मोबाइल क्रमांक डैली हट नावाच्या वेबसाइटवर आहे. ज्यांना मुलांची गरज आहे ते त्याला फोन करुन सांगतात आणि नंतर मुलाची व्यवस्था केली जाते.पोलिसांनी या प्रकरणी 11 जणांना अटक केली आहे. तर फरार झालेल्या तीन आरोपींची शोध घेतला जात आहे.