Tehelka Founder Tarun Tejpal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

तरुण तेजपाल (Tarun Tejpal). तहलका (Tehelka) मासिकाचा संस्थापक. काही वर्षांपूर्वी भारतीय प्रसारमाध्यमांमील एक वलयंकीत नाव. एका लैंगिक त्याचार आणि कथीत बलात्कार प्रकरणात नाव (Tarun Tejpal Sexual Assault Case) आले आणि हे नाव झाकोळलं गेलं. देशातील एक धडाडीचा पत्रकार अशी ओळख असलेल्या या पत्रकाराला याच प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली. त्यानंतर गोवा उच्च न्यायालयाने तब्बल आठ वर्षांनंतर या पत्रकाराला निर्दोश मुक्त केले. तहलका मासिकाचे संस्थापक आणि माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल Tehelka Founder Tarun Tejpal) यांच्याबाबतचे हे प्रकरण नेमके आहे काय? त्यांना का जावं लागलं तुरुंगात आणि आता त्यांचे कायदेशीर भविष्य कसे असेल याबाबत घेतलेला हा एक अल्पसा आढावा.

कोण आहेत तरुण तेजपाल?

तरुण तेजपाल हे एक भारतीय पत्रकार, प्रकाशक आणि लेखक आहेत. इंडिया टुडे, इंडियन एक्सप्रेस यांसारख्या भारतातील मातब्बर प्रसारमाध्यम समुहांमध्ये पत्रकार आणि इतर पदावर महत्त्वाची भूमिका निभावली. त्यानंतर तेजपाल यांनी मार्च 2020 मध्ये 'तहलका' नावाचे एक मासिक सुरु केले. या मासिकाचे ते प्रकाशक आणि मुख्य संपादकही राहिले आहेत. नोव्हेंबर 2013 मध्ये सहा महिन्यांसाठी ते पदावरुन दूर झाले होते. त्यांनी विविध राजकीय नेत्यांच्या घेतलेल्या मुलाखती, स्टींग ऑपरेशन्स आणि विविध विषयांवर केलेले लिखान नेहमीच गाजले. त्यामुळे भारतातील नामवंत पत्रकारांमध्ये नेहमीच त्यांचा समावेश राहिला आहे. (हेही वाचा, Sexual Assault Case Against Tarun Tejpal: गोवा सत्र न्यायालयाकडून तेहलका चे माजी संपादक तरूण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता)

तुरुंगात जाण्यासारखे काय घडले?

सन 2013 मध्ये गोव्यातील एका आलीशान हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांच्यावर विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला. हा आरोप तरुण तेजपाल यांच्या एका महिला सहकाऱ्याने केला होता. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने याची मोठी चर्चा झाली. गोवा पोलिसांनी तरुण तेजपाल यांच्याविरुद्ध नोव्हेंबर 2014 मध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर लगेच त्यांना अटकही झाली. मे 2014 मध्ये त्यांना जामीन मिळाला. गोवा पोलीसांनी 2014 मध्ये त्यांच्या विरोधात 2846 पानांचे आरोपपत्र दाखल केले.

Tarun Tejpal | (Photo Credits: Tehelka)

कोणत्या कलमांखाली चालला खटला?

पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर गोवा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. यात भादंसं कलम 342 (बेकायदेशीर पद्धतीने आडवणूक करणे), 342 (चुकीच्या हेतूने कैद करणे), 354 (प्रतिमाहनन करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), 354-अ (लैंगिक छळ), 376 (2) (महिलांवर अधिकार स्थिती दाखवणाऱ्या व्यक्तीकडून बलात्कार), 376(2) (क) (नियंत्रण मिळवण्याच्या हेतू व्यक्तीद्वारे बलात्कार) आदी कलमांद्वारे तरुण तेजपाल यांच्यावर खटला चालला.

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

पोलिसांनी महिलापत्रकाराच्या तक्रारीच्या आधारे आरोपपत्रात केलेल्या उल्लेखानुसार, गोव्यातील एका ठिकाणी रात्रीच्या वेळी तहलका मासिकाचा कार्यक्रम होता. त्या दिवशी रात्रीच्या वेळी पाहुण्यांना आपल्या खोरीपर्यंत सोडून पीडित महिला पत्रकार परतत होती. त्या वेळी हॉटेलच्या ब्लॉक 7 च्या एका लिफ्टमध्ये तिला तिचे बॉस तरुण तेजपाल भेटले. त्यांनी पाहुण्यांना सोडल्याबाबत विचारुपस करत त्यांना पुन्हा एकदा जागे करण्याचे सांगत तिला (महिला पत्रकारास) अचानक लिफ्टमध्ये खेचले. महिला पत्रकाराने दिलेल्या जबाबाचा उल्लेख करत गोवा पोलिसांनी म्हटले की, पीडितेला लिफ्टमध्ये खेचल्यावर तरुण तेजपाल यांनी लिफ्टचे बटन अशा पद्धतीने दाबले की त्यामुळे लिफ्ट कुठे थांबलीही नाही आणि उघडलीही नाही. त्यानंतर बंद लिफ्टमध्ये त्यांनी जे केले त्यानंतर तेजपाल यांच्या आयुष्यात 'तहलका' झाला. तरुण तेजपाल यांच्यावर आरोप करणारी महिला पत्रकार ही त्यांची सहकारीच होती.

दरम्यान, गोवा सरकारने म्हटले आहे की, न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आपण पुन्हा दाद मागणार आहोत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जर गोवा सरकार वरच्या कोर्टात गेले तर हे प्रकरण पुन्हा सुनावणीस येऊ शकते. त्यानंतर वरचे कोर्ट जे काय निर्णय देते यावर तरुण तेजपाल यांचे कायदेशीर आणि एकूणच भविष्य अवलंबून असेल.