Gangster Kala Jatheri to Marry Lady Don Anuradha: कुख्यात गँगस्टर काला जठेडी (Kala Jatheri) त्याची गर्लफ्रेंड अनुराधासोबत 12 मार्च रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. तो तुरुंगातून बाहेर येऊन दिल्लीत लग्न करणार आहे. त्यानंतर, त्याला 13 मार्च रोजी सोनीपत येथील घरात प्रवेश करण्यासाठी सहा तासांचा पॅरोल देण्यात आला आहे. दिल्लीच्या द्वारका कोर्टाने गँगस्टर संदीप उर्फ काला जठेडीला कोठडी पॅरोल मंजूर केला आहे. माहितीनुसार, महिला गँगस्टर मॅडम मिंज उर्फ अनुराधा चौधरी हिच्यासोबत काला जठेडी लग्न करणार आहे. जुलै 2021 मध्ये सहारनपूरमध्ये काला जठेडी आणि त्याच्या गर्लफ्रेंडला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पकडले होते.
कालाला पकडण्यासाठी 7 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. संदीपवर संघटित गुन्हेगारी सिंडिकेट चालवल्याबद्दल महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) यासह अनेक गंभीर आरोप आहेत. दिल्लीचा प्रसिद्ध कुस्तीपटू सागर धनकर हत्या प्रकरणानंतर संदीप जठेडी चर्चेत आला. गँगस्टर संदीपवर दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पंजाबमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
काला जठेडीचे बहुतांश शूटर परदेशात आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काला जठेडीवर मकोका लागू केला असून, तो एक दशकापासून गुन्हेगारीच्या जगावर राज्य करत आहे. द्वारका न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक वासन यांनी संदीपच्या वकिलाचा युक्तिवाद आणि दिल्ली पोलिसांच्या जबाबाचा आढावा घेतल्यानंतर त्याला लग्न करण्यासाठी कोठडीत पॅरोल देण्याचा निर्णय घेतला.
न्यायालयाने अधिकाऱ्यांना 12 मार्च रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत संदीपला त्याच्या लग्न समारंभात घेऊन जाण्याचे निर्देश दिले आहेत आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचे काम दिल्ली पोलिसांनाही दिले आहे. याशिवाय 13 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत त्यांना काला जठेडीला त्याच्या गावी घेऊन जाण्यास सांगितले आहे. द्वारका दक्षिण पोलीस ठाण्यात कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 387 (खंडणी), 120बी (गुन्हेगारी कट) आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात संदीपच्या वतीने कोठडी पॅरोलसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा: HC On Household Work: बायकोकडून घरकामाची अपेक्षा ठेवणे क्रूरता नाही; दिल्ली उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी)
काला जठेडी सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. अनुराधा गुन्हेगारी जगतात लेडी डॉन आणि रिव्हॉल्व्हर राणी म्हणून प्रसिद्ध होती. अधिवक्ता रोहित दलाल यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कलम 21 अंतर्गत विवाह करण्याचा अधिकार हा घटनात्मक अधिकार म्हणून घोषित करण्यात आला आहे. हिंदू विवाह कायदा, 1955 च्या तरतुदीनुसार दोघेही प्रौढ आहेत. अशा स्थितीत लग्नास नकार दिल्याने पूर्वग्रह निर्माण होईल आणि घटनेच्या कलम 21 चे उल्लंघन होईल. आरोपीला आपले कुटुंब वाढवायचे आहे. आरोपीचे आई-वडीलही वृद्धापकाळाने त्रस्त असून गेल्या वर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर मानवतावादी कारणास्तव त्याला पॅरोल मंजूर केला गेला.