Human Milk | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

Human Milk Not For Sale: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने मानवी दूध (Human Milk) आणि त्याच्या उत्पादनांच्या विक्री आणि व्यापारीकरणाविरूद्ध कठोर इशारा देत महत्वपूर्ण आदेशच जारी केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, भारतीय कायद्यानुसार भारतात आईच्या दुधाचे व्यापारीकरण (Mother's Milk Commercialization) करण्यास किंवा तशी पद्धत वापरण्यास परवानगी नाही. नियामक संस्थेने यााबत एक निवेदन प्रसिद्ध करत देशात अशा पद्धतींना बंदी असल्याचे अधोरेखित केले. तसेच, परवानगी अधिकाऱ्यांनाही निर्देशांद्वारे स्पष्टी तंबी दिली. नियम आणि कायद्याचे उल्लंघ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही नियामक संस्थेने म्हटले आहे. मातेचे दूध हे पूर्णपणे मोफत आहे. ते केवळ अर्भकांसाठी असून त्याचा व्यावसायिक वापर (Human Milk Commercialization) कोणत्याही स्थितित करता येणार नाही, यावर संस्थेने भर दिला.

कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कार्यालयाने मार्गदर्शक तत्वांवर आधारीत काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या कार्यालयाला मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या व्यापारीकरणाबाबत विविध नोंदणीकृत संस्थांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. या संदर्भात, हे लक्षात घेतले जाऊ शकते की FSSAI ने FSS कायदा, 2006 आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियम/नियमांनुसार मानवी दुधाची प्रक्रिया आणि/किंवा विक्री करण्यास परवानगी दिली नाही.” नियामक संस्थेने यावर जोर दिला की मानवी दुधाच्या व्यापारीकरणाशी संबंधित सर्व कृती, पद्धती त्वरीत थाबविल्या गेल्या पाहिजेत. अशा काही कृतींमध्ये गुंतलेल्या सर्व व्यक्ती, संस्थांनी तातडीने हे उद्योग थांबवले पाहिजेत. अन्यथा उल्लंघन करणाऱ्यांना FSS कायदा, 2006 आणि त्याच्याशी संबंधित नियम आणि नियमांनुसार कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. (हेही वाचा, FSSAI On Adulteration: भेसळ रोखण्यासाठी एफएसएसआय आक्रमक; दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर देशभरात ठेवली जाणार करडी नजर)

'खबरदार! जर परवानगी द्याल', अधिकाऱ्यांना तंबी

FSSAI ने परवाना अधिकाऱ्यांना मानवी दुधाच्या विक्रीत गुंतलेल्या कोणत्याही युनिटला मंजुरी देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशांमध्ये म्हटले आहे की, "राज्य आणि केंद्रीय परवाना प्राधिकरणांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की 'मातेचे दूध/मानवी दूध' प्रक्रिया किंवा विक्रीमध्ये गुंतलेल्या अशा FBOs ला कोणताही परवाना/नोंदणी दिली जाणार नाही." निर्देशाचे कोणतेही उल्लंघन केल्यास FSS कायदा, 2006 आणि त्याच्याशी संबंधित नियम आणि नियमांच्या तरतुदींनुसार संबंधित अन्न व्यवसाय ऑपरेटर (FBOs) विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. (हेही वाचा, Use of Banned Oxytocin Delhi Dairies: सावध रहा! आता घरी येणारे दूधही नाही सुरक्षित; दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात धक्कादायक खुलासा)

मातेचे दूध व्यावसायिक विक्रीसाठी नाही

राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डोनर ह्युमन मिल्क (DHM) व्यावसायिक कारणांसाठी वापरता येत नाही. हे केवळ सर्वसमावेशक स्तनपान व्यवस्थापन केंद्रे (CLMCs) सुसज्ज असलेल्या आरोग्य सुविधांमध्ये केवळ नवजात आणि अर्भकांसाठी आहे. मार्गदर्शक तत्त्वे निर्दिष्ट करतात की मानवी आईच्या दुधाचे दान दात्याला कोणत्याही आर्थिक नुकसानभरपाईशिवाय मुक्तपणे आणि स्वेच्छेने केले पाहिजे. दान केलेले दूध सरकारी नियमांनुसार रुग्णालयातील नवजात आणि इतर मातांच्या अर्भकांना पाजण्यासाठी मोफत वापरायचे आहे.

मंजूरी रोखणयाचे आदेश

FSSAI ने परवाना अधिकाऱ्यांना मानवी दुधावर प्रक्रिया करण्याचा किंवा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांना मंजूरी रोखण्याचे निर्देश दिले. "राज्य आणि केंद्रीय परवाना प्राधिकरणांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की 'मातेचे दूध/मानवी दूध' प्रक्रिया किंवा विक्रीमध्ये गुंतलेल्या अशा FBOs ला कोणताही परवाना/नोंदणी दिली जाणार नाही," असा सल्लाही नियामक संस्थेने दिला आहे.