पी चिदंबरम यांनी तिहार कारागृहातून बाहेर आल्यावर पहिल्याच प्रतिक्रियेत काय म्हटले?
P Chidambaram | (Photo Credits: ANI)

देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री (Former Union Finance Minister) आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते (Senior Congress leader) पी. चिदंबरम (P Chidambaram) यांना अखेर जामीन मिळाला आणि ते तब्बल 106 दिवसांनी तिहार (Tihar Jail) कारागृहातून बाहेर पडले. आईएनएक्स मीडिया (INX Media) मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर पडल्यावर दिलेल्या पहिल्याच प्रतिक्रियेत चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मनमोहन सिंह, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह समस्त काँग्रेस आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. दरम्यान, हे आभार मानत असताना 106 दिवस कारागृहात कैद करुन ठेवले परंतू, तरीही माझ्या विरुद्ध एकही आरोप निश्चित करण्यात आला नाही, असा टोलाही चिदंबरम यांनी केंद्र सरकारला लगावला. दरम्यान, कारागृहातून बाहेर पडल्यानंतर चिदंबरम हे थेट 10 जनपथ वर असलेल्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले.

चिदंबरम यांचे स्वागत करण्यासाठी तिहार कारागृहाबाहेर शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी पी. चिदंबरम तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.., राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस जिंदाबाद, अशी घोषणाबाजी केली. या वेळी त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, चिदंबरम यांच्या अटकेवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही चिदंबरम यांची अटक म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाई, असल्याची टीका केली होती. (हेही वाचा, INX Media Case: पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर; देश सोडण्यास मनाई)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

दरम्यान, न्यायमुर्ती आर भानुमती, न्यामुर्ती एस ए बोपन्ना आणि न्यायमुर्ती ऋषिकेश राय यांच्या पीठाने चिंदंबरम यांनी जामीन नाकारण्यासंबंधीचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावला. पीठाने म्हटले की, 74 वर्षीय चिंदंबरम यांना दोन लाख रुपयांच्या खासगी जातमुचलक्यावर आणि इतकीच रक्कम दोन जामीनांना आकारुन जामीन मंजुर करण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जर आर्थिक गुन्हा गंभीर स्वरुपाचा असेल तरीही आरोपीला जामीन देने हे नियमाला धरुन आहे. अशा प्रकरणात जामीन नाकारणं हे अपवादात्मक आहे.