Coronavirus: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले कोरोना व्हायरस विरोधात केंद्र सरकारचे विशेष पॅकेज; कर्मचारी, महिला, शेतकरी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार मदत
Nirmala Sitharaman while announcing coronavirus relief package (Photo Credits: ANI)

Special Package For Corona Virus: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज कोरोना व्हायरस (Corona Virus) विरोधात लढण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले. गरीब कल्याण योजना अंतर्गत जाहीर केलेल्या 1,70000 कोटी रुपयांच्या या विशेष पॅकेजमध्ये समाजातील विविध स्थरांचा समावेश करण्यात आला आहे. यात देशातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी हाप्ते भरण्यापासून ते गरजूंच्या बँक खात्यांवर थेट रक्कम जमा करण्यापर्यंतच्या विविध योजनांचा समावेश आहे.

गरीब कल्याण योजना अंतर्गत या पॅकेजच्या सुमारे 8 श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गरीब विधवा-पेंशनर्स-दिव्यांग, जनधन योजना-उज्ज्वला स्कीम, सेल्फ हेल्प ग्रुप (वुमन), ऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स यांना EPFO च्या माध्यमातून, कंस्ट्रक्शन वर्कर्स आदींनाही या पॅकेजचा लाभ मिळणार आहे.

कसे आहे कोरोना व्हायरस विरोधातील पॅकेज?

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्रामुख्याने दोन भागांमध्ये विभागली आहे. पहिल्या भागातात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत 80 कोटी गरीब लोकांना लाभ दिला जाईल. या योजने अंतर्गत पुढच्या तीन महिन्यांपर्यंत पाच किलो तांदूळ/गहू मोफत दिला जाणार आहे.या शिवाय एक किलो डाळ प्रत्येक कुटुंबाला मोफत दिली जाणार आहे. (हेही वाचा, Coronavirus Outbreak: भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढून 649 वर पोहचला)

ट्विट

सुमारे 8.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2000 रुपये जमा केले जातील. देशात मनरेगा योजनेचा लाभ 5 कोटी कुटुंबांना मिळतो. मनरेगा मजुरी आता 182 रुपयांवरुन वाढवून ती 202 रुपये करण्यात आली आहे. ज्येष्ठ दिव्यांग आणि विधवा महिलांना 1000 रुपये वेगळे दिले जातील. हे पैसै पुढच्या तीन महिन्यांमध्ये दिले जातील. त्याचा लाभ सुमारे 3 कोटी लोकांना मिळेल.

ट्विट

कोरोना विरोधात लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलेले डॉक्टर, नर्स, आशाताई, त्यांच्या सहकारी आणि अन्य मेडिकल स्टॉफ यांच्यासाठी वैद्यकीय विम्याचीही घोषणा करण्यात आली आहे.सरकारने या लोकांसाठी 50 लाख रुपयांच्या वैद्यकीय विम्याची घोषणा केली आहे. त्याचा लाभ वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 20 लाख लोकांना मिळेल.

ट्विट

वुमन सेल्फ हेल्प ग्रुप साठी 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. त्याचा लाभ 7 कोटी कुटुंबांना मिळेल.उज्ज्वला योजना अंतर्गत देशातील सुमारे 8.3 कोटी परिवाराला गॅस सिलिंडर दिला जाईल. पुढचे तीन महिने त्यांना गॅस मोफत मिळेल. देशातील महिलांनाच्या नावावर सुमारे 20 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. त्यांच्या खात्यावर पुढचे तीन महिने 500-500 रुपये जमा केले जातील.

ट्विट

ज्या लोकांना EPFO लाभ मिळत आहे त्यांच्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विशेष घोषणा केली आहे. पुढच्या तीन महिन्यांपर्यंत सरकार एंप्लॉयर आणि एंप्लॉयी अशा दोघांचाही हिस्सा (मूळ पगाराच्या 24 टक्के रक्कम) EPFO खात्यावर जमा करेन. हा नियम ज्या कंपनीत 100 पेक्षाही अधिक कर्मचारी काम करतात आणि त्यांचा पगार 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेन अशा कंपन्यांसाठी लागू असेन.