Coronavirus Outbreak: भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढून 649 वर पोहचला
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. तरीही नागरिकांकडून गर्दी काही ठिकाणी केली जात असल्याने कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते. याच पार्श्वभुमीवर आता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जाहिर करण्यात आला आहे. या आकडेवारीत आता कोरोनाबाधितांचा आकडा 593 वरुन 649 वर पोहचला आहे.प्राप्त झालेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून ही एक चिंतेची बाब आहे.

भारतात कोरोना व्हायरसचा आकडा 649 वर गेला आहे. तसेच एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 42 जणांचा डिस्चार्ज आणि कोरोनापासून बरे झालेले रुग्ण आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना कोरोना व्हायरससंबंधित संपूर्ण माहिती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी काही क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत.(Coronavirus: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा; भारतातील सर्व टोल प्लाझावरील टोल वसुलीस तात्पुरती स्थगिती)

दरम्यान, दिल्लीत मोहल्ला क्लिनिक चालवणाऱ्या एका डॉक्टरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे 12 ते 18 मार्च कालावधीत क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन करावे असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने एका नोटिस मध्ये म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी असे सांगितले आहे की, डॉक्टर्स, नर्स किंवा अन्य प्रोफेशनल्स यांना कोरोनाच्या भीतीपोटी घराबाहेर काढणाऱ्या घरमालकांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देशन देण्यात आले आहे. सरकारच्या अधिसुचनेनुसार, कोविड-19 च्या विरोधात लढणाऱ्या आणि त्यावर उपचार करणाऱ्यांना त्रास देण्यात येत आहे. मात्र ही गोष्ट अत्यंत खेदात्मक असून अत्यावश्यक सेवेत बाधा टाकण्यासारखे आहे.