
बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020 आणि इतर कोणत्याच निवडणुकीत वय वर्षे 65 पेक्षा अधिक असलेल्या नागरिकांना मतदानासाठी पोस्टल बॅलेट (Postal Ballot) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे निवडणूक आयोगाने (Election Commission) गुरुवारी (16 जुलै) जाहीर केले. बिहार विधानसभा निवडणूक आणि आगामी काळात होणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये हा नियम लागू करण्यासाठी बऱ्याच अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी पुरेशी साधनसामग्री आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता नसल्याने हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
दरम्यान, वय वर्षे 80 पेक्षा अधिक, आजारपण अथवा अपंगत्व तसेच कोविड 19 या विषाणू संसर्गाचा सामना करत असलेल्या नागरिकांसाठी मात्र टपाली मतदान ही सेवा लागू राहणार आहे. याशिवाय आजपर्यंत सुरु असलेलेली टपाली मतदान सेवाही सुरु राहणार आहे. ही सेवा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि परगावी जाऊन सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असते. ती कायम राहणार आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आयसोलेशेन आणि क्वारंटनाईन असलेल्या नागरिकांसाठीही ही सेवा उबलब्ध करुन दिली जाणार आहे. (हेही वाचा, Election Rule: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 65 वर्षांवरील व कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्ती Postal Ballots द्वारे करू शकतात मतदान)
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, देशातील कोरोना व्हायरस संक्रमण स्थिती विचारात घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर मर्यादित मतदारसंख्या राहील याची खबरदारी घेतली जाणार आहे. जसे की एका मतदान केंद्रावर एका वेळी जास्तीत जास्त केवळ 1000 मतदार उपस्थित राहतील असे पाहिले जाणार आहे. देशातील कोरोना व्हायरस स्थिती आणि त्याचा प्रादुर्भाव विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचेही आयोगाने एका पत्रकात म्हटले आहे. (हेही वाचा,Bihar Assembly Election 2020: 'काठीने ताप बघणे' ऐकले असेल 'काठीने मतदान करणे' ऐकले आहे का? म्हणेज बिहार विधानसभा निवडणुकीत असे घडणार )
Commission decides not to extend the facility of postal ballot to electors above 65 years of age in General Assembly Elections in Bihar and by elections due in near future in view of constraints of logistics, manpower and safety protocols of Covid-19 https://t.co/HN31UZ7Pt7
— Sheyphali Sharan (@SpokespersonECI) July 16, 2020
कोरोना व्हायरस प्रादुर्भाव ध्यानात घेऊन मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. त्यामुळे एका मतदार यादीत 1000 मतदारांची नावे असतील. दुसऱ्या बाजूला 34,000 अधिक मतदार केंद्रं उभारली जातील. जी साधारण 45% अधिक आहेत. या सर्वांची मिळून संख्या 1,06,000. इतकी होते.