सध्या देशात कोरोना विषाणू (Coronavirus) महाम्रीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे, अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने (Election Commission) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता निवडणूक आयोगाने 65 वर्षांवरील लोकांना मतदानासाठी पोस्टल बॅलेट (Postal Ballot) वापरण्याची परवानगी दिली आहे. यासह, कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण देखील टपाल मतपत्रिका वापरू शकतात. निवडणूक आयोगाचा हा निर्णय बिहार निवडणुकीसाठी (Bihar Assembly Elections 2020) लागू होईल. देशात दररोज हजारो कोरोना विषाणू रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता निवडणुकांमध्ये टपाल मतपत्रिकेसाठी मतदारांची वयोमर्यादा कमी करण्यात आली आहे.
Notification for Conduct of Elections (Amendment) Rules 2020 - for extending Postal Ballot Facility for electors above age of 65yrs & Covid+ve under home/institutional quarantined pic.twitter.com/806HGprL9K
— Sheyphali Sharan (@SpokespersonECI) July 2, 2020
यापूर्वी, गेल्या वर्षी 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कायदा मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 80 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध आणि अपंग मतदारांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा देण्यात आली होती. त्यावेळी मंत्रालयाने मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क देण्यासाठी 1961 च्या निवडणूक नियमात सुधारणा करून त्यांना गैरहजर मतदारांच्या वर्गात समाविष्ट केले होते. सध्याच्या काळात केवळ सैन्यातील सैनिक, निमलष्करी दले आणि परदेशात काम करणारे सरकारी कर्मचारी आणि निवडणूक ड्युटीवर तैनात असणाऱ्या लोकांनाच टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा अधिकार आहे. (हेही वाचा: भारतीय रेल्वेने रचला इतिहास; 1 जुलै रोजी देशातील सर्व गाड्या पोहोचल्या वेळेवर, Punctuality Rate 100 टक्के)
एएनआय ट्वीट -
Ministry of Law & Justice issues notification for Conduct of Elections (Amendment) Rules 2020 - for extending postal ballot facility for electors above the age of 65 years & #COVID19 patients under home/institutional quarantine: Election Commission of India (ECI) pic.twitter.com/XPKeORe8gO
— ANI (@ANI) July 2, 2020
वृद्धापकामुळे किंवा अन्य शारीरिक अपंगत्वामुळे मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी असमर्थ मतदारांचा सहभाग मतदानामध्ये सुनिश्चित करणे, हा या निर्नामागील हेतू आहे. आता कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेक मतदारांना केंद्रावर पोहोचणे शक्य नाही. एका अंदाजानुसार अशा मतदारांची पुरेशी संख्या पाहता टपाल मतपत्रिका सुविधा मिळाल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत कोरोना पॉझिटिव्ह/शंकास्पद आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदार टपाल मतपत्रिकेद्वारे आपले मत नोंदवू शकतील.