सध्या भारतीय रेल्वेमध्ये अनेक बदल होत आहेत. आरामदायी प्रवासासाठी अनेक नवे बैशिष्ठ्ये रेल्वेमध्ये जोडली जात आहेत. मात्र रेल्वे सुरु होऊन आज इतक्या वर्षांनतर ती वेळेवर येण्याबद्दलच्या तक्रारी काही कमी झाल्या नाहीत. मात्र आता याबाबत भारतीय रेल्वेने इतिहास रचला आहे. 1 जुलै रोजी देशात धावणा-या 201 रेल्वे गाड्या त्यांच्या वेळापत्रकानुसार स्थानकांवर पोहोचल्या आहेत. रेल्वेने म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच सर्व गाड्या 100% वेळेवर धावल्या आहेत आणि वेळेवर त्यांच्या गंतव्या स्थानावर पोहोचल्या आहेत.
यापूर्वी 23 जून 2020 रोजी फक्त एकच ट्रेन लेट झाली होती, ज्यामुळे रेल्वेchaa वक्तशीरपणा 99.54 टक्के नोंदवला गेला होता. वेळेच्या भारतीय रेल्वेचे नाव बाबतीत नेहमीच खराब राहिले आहे. बहुतेक गाड्या उशिरा येणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु गेल्या काही वर्षात रेल्वे प्रशासनाने हा ‘उशीर’ कमी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेकवेळा रेल्वे वेळेत पोहोचली आहे त्यामुळे उशिरा पोहोचणाऱ्या गाड्यांमध्ये निरंतर घट दिसून आली आहे. आता 1 जुलै रोजी रेल्वेने चालवलेल्या 201 गाड्या वेळेवर पोहोचल्या आहेत.
दरम्यान, तेजस एक्स्प्रेसला उशीर झाल्यास प्रवाशांना भरपाई मिळते. ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना आंशिक परतावा दिला जातो. ट्रेन जर 1 तासापेक्षा थोडी जास्त उशिरा आली असेल, तर प्रवाशांना 100 रुपये व दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपयांचा परतावा दिला जातो. मात्र ही सुविधा केवळ खासगी गाड्यांमध्येच उपलब्ध आहे. (हेही वाचा: गोवा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज; 250 हॉटेल्ससाठी सरकारने दिली परवानगी, फिरायला जाण्याआधी जाणून घ्या नियम)
यासह भारतीय रेल्वे आपल्या गाड्यांचा वेग वाढवण्यावर भर देत आहे. दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते हावडा या दोन मार्गांवर 130 किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे चालविण्याची तयारी सुरू आहे. कमी वेळात प्रवाशांना त्यांच्या इच्छित थाळी पोहोचवणे हा यामागील हेतू आहे.