मिजोरम (Mizoram) राज्य सोमवारी (22 जून 2020) पहाटे-पहाटे पुन्हा एकदा भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यांनी हादरले. पहाटे 4.10 मिनीटांनी या भूकंपाची धक्के जाणवले. मिजोरम राज्यातील चंपाई Champha परिसरात भूकंपाचा केंद्र बिंदू होता. भूकंपमापन भूकंपाची नोंद 5.5 इतकी झाली. दरम्यान, भूकंपामुळे झालेल्या कोणत्याही जीवित अथवा वित्त हानीची अद्याप उबलब्ध नाही. मिजोरम राज्यात गेल्या तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. या आधी शुक्रवारीही या राज्या भूकंपाचे धक्के जानवले होते.
शुक्रवारी (19 जून 2020) आलेला भूकंप हा आजच्या तुलनेत काहीसा कमी तीव्रतेचा होता. शुक्रवाच्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (भूकंपमापन यंत्र) 5.0 इतकी झाली होती. तीन दिवसांच्या फरकाने मिजोरम राज्यात दुसऱ्यांदा भूकंप आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, भूकंपाच्या कारणांवरुन अभ्यासकांमध्ये वेगवेगळे प्रवाह पाहायला मिळत आहेत. काही अभ्यासकांच्या मते अशा हलक्या हलक्या भूकंपामुळे मोठ्या भूकंपाची तीव्रता कमी होत जाते. तर काही अभ्यासकांना वाटते की असे भूकंप भविष्याती मोठ्या भूकंपाचे संकेत आहेत. (हेही वाचा, Earthquake in Delhi-NCR: दिल्ली-एनसीआर परिसरात दीड महिन्यात 11 वेळा भूकंप, मोठ्या आपत्तीचे संकेत; बुधवारीही पुन्हा बसले धक्के)
An earthquake of magnitude 5.5 on the Richter scale, occurred 27 km south-southwest of Champhai, Mizoram at 04:10:52 (IST) today: National Centre for Seismology pic.twitter.com/bmOqIAHsfr
— ANI (@ANI) June 22, 2020
राज्याच्या इतिहासात डोकावले तर मिजोराम राज्यात 1897 मध्ये मोठा भूकंप आला होता. त्या वेळी या भूकंपाची तीव्रता 8.2 इतकी असल्याची नोंद आहे. या भूकंपाचे केंद्र शिलंगा येथे होते. तर 1950 मध्ये असम राज्यात 8.7 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता. ज्यामुळे ब्रह्मपुत्र नदीने आपला प्रवाह बदलल्याचे सांगितले जाते.