
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) चे आजपासून नवीन नियम सुरु होणार आहेत. ट्रायने यापूर्वी ही त्यांनी दिलेल्या अंतिम वेळेची शेवटची तारीख पुढे ढकलली होती. परंतु यावेळी 1 फेब्रुवारी पासून नियम बदलण्यात येणार आहेत. त्याचसोबत केबल चालक आणि ब्रॉडकास्टर्स यांनी ट्रायने दिलेल्या वेळेनुसार त्यांचे प्लॅन सुरु केले आहे. डीचीएच (DTH) कंपनी त्यांच्या ग्राहकांना मोबाईल अॅप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून प्लान बदलण्यास सूचना देत आहे. त्यामुळे तुम्ही डीटीएचच्या कस्टमर केअरला फोन करुन तुमचे प्लॅन बदलू शकतात.
नव्या नियमांनुसार ग्राहकांना आता फक्त त्यांना जे टीव्ही चॅनल पाहायचे आहेत त्याचेच पैसे द्यावे लागणार आहेत. तर Base Pack साठी ग्राहकांना पैसे देणे अनिवार्य आहे. तर बेस पॅक हा 130 रुपयांचा असणार असून त्यावर कर आकारला जाणार आहे. ऐवढ्या पैशांमध्ये तुम्हाला फ्री चॅनलसुद्धा पाहता येणार आहे. तसेच 100 चॅनलचे एक पॅकेज मिळणार आहे. त्याचसोबत तुम्हाला पैसे भरुन चॅनल पाहायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक चॅनलसाठी आकारणात येणारी रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. (हेही वाचा-TRAI देणार आता Set Top Box ऐवजी DTH बदलण्याची सुविधा)
आता तुम्हाला नवीन प्लॅन सुरु करायचा असेल तर ते सोपे होणार आहे. त्यामुळे डीटीएचची सुविधा देणाऱ्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपवरुन तुम्हाला नवीन चॅनलचे पॅकेज निवडता येणार आहे. तसेच कंपनीने ग्राहकांसाठी दोन ऑप्शन दिले आहेत. त्यात एक म्हणजे कंपनीकडून देण्यात आलेले चॅनल पॅकेज आणि दुसरे म्हणजे तुमच्या आवडीचे चॅनल पाहण्यासाठी ठरविलेली रक्कम भरुन तुम्हाला चॅनल पाहता येणार आहे. मात्र तुम्हाला 100 चॅनल घेण्यासाठी सध्या सुविधा देण्यात आली आहे. तर 100 पेक्षा जास्त चॅनल हवे असल्यास फक्त 25 चॅनल ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.(दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयापूर्वीच TATA SKY कडून चॅनल पॅकेजचे नवे दर जाहीर)
डीटीएच आणि एसडी (SD) चॅनलसाठी ठरविण्यात आलेल्या रक्कम वेगवेगळ्या आहेत. तसेच एचडी चॅनल पाहण्यासाठी पूर्वीसारखा सेट टॉप बॉक्स असणे आवश्यक असणार आहे.