TV Cable Charges (Photo Credits: Twitter)

1 फेब्रुवारी पासून लागू होणाऱ्या चॅनलच्या नियमांपूर्वी 6 दिवस अगोदर देशातील सर्वात मोठी डीटीएच (DTH) कंपनी टाटा स्काय (TATA SKY) यांनी आपले चॅनलचे पॅकेज ग्राहकसांठी घोषित केले आहेत.

टाटा स्कायने ट्राय (TRAI) विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालात एक खटला दाखल केला होता. या खटल्यावर 28 जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. परंतु ट्राय कडून वारंवार टाटा स्काय कंपनीवर दबाव टाकण्यात येत होता. तसेच टाटा स्कायने त्यांच्या ग्राहकांसाठी टीव्ही चॅनलसाठी आकारण्यात येणारी चॅनल पॅकेजनुसारची रक्कम सांगण्यात यावी असे सांगितले जात होते. तर इतर डीटीएच कंपनी आणि केबल धाकरांनी त्यांचे चॅनल पॅकेजची रक्कम किती असणार हे सांगितले होते. त्यामुळे आता टाटा स्काय कंपनीने त्यांचे चॅनल पॅकेज जाहीर केले आहेत.

त्यामुळे आता टाटा स्कायने त्यांच्या ग्राहकांना नव्या चॅनल पॅकेजच्या किंमती वेबसाईट, मोबाईल अॅप आणि डिलर्स यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच येत्या एका आठवड्यात सर्व ग्राहकांचे चॅनल पॅकेज नव्या दराने बदलण्यात येणार आहेत. कंपनीने लॉन्च केलेल्या चॅनल पॅकेजची सुरुवात 181 रुपयांनी होत आहे. तर सर्वात जास्तीत जास्त महाग चॅनलचे पॅकेज 766 रुपयांनी सुरु होणार आहे. हिंदी चॅनलचे बोलायचे झाले तर 212 रुपये प्रति महिना सुरु होऊन 473 रुपये जास्तीत जास्त आहे.