TRAI लवकरच त्यांच्या ग्राहकांना DTH सेवेत बदल करुन ती सोप्या पद्धतीची बनवणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सेट टॉप बॉक्स (Set Top Box) न खरेदी करता DTH सेवेत बदल करु शकणार आहे. ट्रायचे मुख्य अधिकारी आर. एस. शर्मा यांच्यानुसार, प्राधिकरण डीटीएच नेटवर्क्समध्ये इंटरकनेक्टिव्ही लागू करण्याचे काम करत आहे.
त्यामुळे वर्षाच्या शेवटी ही योजना लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ग्राहक एका डीटीएचला दुसऱ्या डीटीएचमध्ये सेट टॉप बॉक्सशिवाय बदलू शकणार आहे. मात्र ग्राहकांना आपल्या सेट टॉप बॉक्समध्ये नवीन सॉफ्टवेअर टाकावे लागणार आहे.(हेही वाचा-टीव्ही वाहिन्यांबाबत TRAI चे नवे नियम; 130 रुपयांत तब्बल 100 चॅनेल्स पाहायची संधी)
परंतु डीटीएचमध्ये बदल करणे सोपे होणार असून एसबीटी (SBT) ची सॅक्युरिटीसुद्धा प्रभावित होणार आहे. मात्र काही कंपन्यांकडून या योजनेला विरोध केला जात आहे.