गुजरातच्या (Gujarat) कच्छच्या रणमधील (Rann of Kutch) हडप्पाकालीन शहर (Harappan City) असलेल्या धोलाविरा (Dholavira) या स्थळाचे नामांकन, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (UNESCO's World Heritage list) समाविष्ट झाले आहे. धोलाविरा: हडप्पा शहर याला जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळण्यासाठी यासाठी भारताने जानेवारी, 2020 मध्ये जागतिक वारसा केंद्रात नामनिर्देशन पत्र सादर केले होते. 2014 पासून हे स्थळ जागतिक वारसा स्थळांच्या युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट होते. धोलावीरा: हडप्पा शहर हे दक्षिण आशियातील काही मोजक्या चांगल्या संरक्षित शहरी वसाहतींपैकी एक आहे, जे इसवी सन पूर्व तिसऱ्या ते दुसऱ्या मध्य सहस्त्रकाच्या दरम्यान वसवण्यात आले आहे.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे की, “या बातमीने अत्यंत आनंद झाला. धोलाविरा हे एक महत्त्वाचे शहरी केंद्र होते आणि हे आपल्या भूतकाळाशी संबंधित असलेला सर्वात महत्वाचा दुवा आहे. विशेषत: इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्रात रस असणार्यांसाठी हे नक्कीच भेट देण्यासारखे स्थळ आहे. ”
वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्यानंतर केंद्रीय संस्कृती , पर्यटन आणि ईशान्य विभाग विकास मंत्री श्री. जी किशन रेड्डी यांनी लगेचंच ट्विटरवर ही बातमी जाहीर केली. .तेलंगाना राज्यात मुलुगु जिल्ह्यात पालमपेट येथील रुद्रेश्वर मंदिराला (ज्याला रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते) भारतातील 39 वे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाल्यानंतर काही दिवसांनीच ही घोषणा झाली आहे. नक्की वाचा: लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र; पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा.
या यशस्वी मानांकनानाच्या माध्यमातून,भारताकडे आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि एका संमिश्र स्थळांचा समावेश आहे.केंद्रीय संस्कृती मंत्र्यानी 40 किंवा त्याहून अधिक जागतिक वारसा स्थळ असलेल्या देशांचा उल्लेख केला ज्यात भारताव्यतिरिक्त यामध्ये इटली, स्पेन, जर्मनी, चीन आणि फ्रान्स यांचा समावेश आहे. जागतिक वारसास्थळांच्या यादीत 2014 पासून भारताने 10 नवीन जागतिक वारसास्थळे कशी समाविष्ट केली आणि हे भारतीय संस्कृती, वारसा आणि भारतीय जीवनशैली यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांची दृढ वचनबद्धताही मंत्र्यानी आपल्या आपल्या ट्विटमध्ये नमूद केली.