(Representational Image-File Image)

राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच NCRB च्या 2020 रिपोर्टनुसार, दिल्लीत 2015 आणि 2020 दरम्यान, कोणत्याही भारतीय शहरात मुलांना असेच वाऱ्यावर सोडून देण्याची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. या काळात महाराष्ट्रात अशीच सोडलेली मुले, भ्रुण हत्या आणि लहान मुलांच्या हत्येची सर्वाधिक 6459 प्रकरणे समोर आली आहेत. जी राष्ट्रीय आकडेवारीच्या 18.3 टक्के आहे.(COVID-19 Vaccine For Children: लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी 'अशी' असेल प्रक्रिया, जाणून घ्या कोणती देणार लस ?)

मुलांना सोडून देण्यात महाराष्ट्रात 1184 प्रकरणांसह प्रथम स्थान, मध्य प्रदेश 1168 आकडेवारीसह दुसरे स्थान आणि त्यानंतर राजस्थान 814, कर्नाटक 771 आणि गुजरात 650 अशी आकडेवारी आहे. शहरात दिल्ली 221 प्रकरणे असून ते सर्वाधिक अव्वल आहे. त्यानंतर बंगळुरु 156, मुंबई, अहमदाबाद 75 आणि इंदौर 65 आहे.(जीन्स आणि मोबाईल असलेल्या मुली नाही तर 40-50 वर्षांच्या महिलांवर पंतप्रधानांचा प्रभाव, दिग्विजय सिंह यांच वादग्रस्त विधान)

द टाइम्स ऑफ इंडियाच्या मते, एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने म्हटले की शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील प्रकरणे वेगवेगळी आहेत. शहरी क्षेत्रात सामाजिक-आर्थिक घटक तर ग्रामीण परिसरात मुलांच्या जन्माचा मुद्दा असू शकतो. तपासात या सर्व प्रकरणांना सर्वोच्च प्राथमिकता दिली जाते.

पोलिसांच्या भाषेत मुलांना वाऱ्यावर सोडून देण्याच्या प्रकरणांच्या तीन श्रेण्या केल्या जातात. त्यामध्ये शिशूहत्या, भ्रुण हत्या आणि मुलांना असेच वाऱ्यावर सोडून देण्याच्या प्रकाराचा समावेश आहे. तपासकर्त्यांनी असे म्हटले की, शिशू हत्या आणि भ्रुण हत्येचे मुख्य कारण गरीबी आहे. तर कन्या भ्रुण हत्या ही हुंडा आणि आर्थिक स्थितीमुळे केली जाते. अन्य कारणांमध्ये विकृत शिशू, अकाल, सपोर्ट सर्व्हिसरची कमी आणि तणाव याचा ही समावेश असू शकतो.

कोविड19च्या परिस्थितीनंतर महाराष्ट्रात सोडून दिलेल्या शिशूंच्या संख्येत घट दिसून आली. एनसीआरबीच्या 2020 रिपोर्ट्स नुसार वर्ष 2020 मध्ये महाराष्ट्रात 143 प्रकरणे समोर आली. तर गेल्या वर्षात 185 प्रकरणे समोर आली होती. पोलिसांच्या द्वारे तपास केल्यानंतर सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत.