दिल्लीत (Delhi) 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेल्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) आकाशात पतंगा उडत असल्याचे दिसून आले. मात्र पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या मांजामुळे शेकडो पक्षी जखमी झाल्याची घटना घडली आहे. काचेचे कोटिंग अससेल्या धारधार मांजामुळे 90 टक्क्यांहून अधिक पक्षांना दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु पुढील 48 तासात जखमी झालेल्या पक्षांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.(Independence Day 2020: लडाखच्या इंडो तिबेट सीमा जवानांनी 14,000 उंचीवर ध्वजारोहण करुन साजरा केला भारतीय स्वातंत्र्य दिन; Watch Video)
चांदनी चौक आणि करोल बाग मधील चॅरिटेबल बर्ड हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ. हरवतार सिंग यांनी असे म्हटले आहे की, बंदी घालण्यात आलेल्या मांजामुळेच बहुतांश पक्षी जखमी झाले आहेत. तर दुपारी 2 वाजेपर्यंत चांदनी चौक येथून 35 पक्षी जखमी झाल्याची प्रकरणे समोर आली. त्यापैकी 30 पक्षी हे मांजामुळेच जखमी झाले होते. अशीच परिस्थिती करोल बाग येथील आहे. दीर्घकाळासाठी काही पक्षी जखमी झाले असून त्यामधील काही जण आता पुन्हा उडू सुद्धा शकणार नाहीत अशी अवस्था त्यांची झाल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. यामध्ये जास्तकरुन कबुतरांचा समावेश आहे.रविवार पर्यंत जखमी झालेल्या पक्ष्यांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारने 2007 मध्येच मांजावर बंदी घातली आहे. कारण मांजामुळे नागरिकांसह पक्षांचा सुद्धा बळी जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
त्याचसोबत चांदनी चौक मधील चॅरिटेबल बर्ड हॉस्पिटल चालवणारे सुनिल जैन यांनी असे म्हटले आहे की, मांजा बंदी ही फक्त पेपर पुरतीच मर्यादित आहे. मात्र मांजामुळे जीव घेण्याची प्रकरणे थांबतच नाहीत. गेल्या वर्षात यंदाच्या वर्षापेक्षा अधिक प्रकरणे समोर आली होती. तरीही मांजा बंदीच्या नियाचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. या वर्षात जखमी झालेल्या पक्षांची आकडेवारी आम्हाला मिळाली असून सोमवार पर्यंत त्याचा आकडा वाढू शकतो असे ही जैन यांनी म्हटले आहे.(Independence Day 2020: स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर सुरक्षेसाठी 'मेड इन इंडिया' Anti-Drone System चा वापर; लेझर हत्यारं, मायक्रो ड्रोन्स निकामी करण्याची क्षमता)
PETA इंडिया यांनी असे म्हटले आहे की, जखमी पक्षांबद्दल माहिती देण्यासाठी नागरिकांनी आपत्कालीन आणि हेल्पाईन क्रमांकावर संपर्क साधावा. दिल्लीत गेल्या वर्षात 700 पक्षी मांजामुळे जखमी झाले. त्यानंतरच्या काही दिवसात मांजामुळेच आणखी काही पक्षी जखमी झाल्याची प्रकरणे समर आली होती. मांजावर बंदी कायम असली तरीही नागरिकांकडून त्याचा वापर करण्यात येत असल्याचे पीटाच्या एका प्रवक्त्यांनी म्हटले आहे.