Independence Day 2020: स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर सुरक्षेसाठी 'मेड इन इंडिया' Anti-Drone System चा वापर; लेझर हत्यारं, मायक्रो ड्रोन्स निकामी करण्याची क्षमता
Anti-Drone System deployed near Red Fort on Independence Day 2020 | (Photo Credits: ANI)

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation) यांनी विकसित केलेल्या अॅंटी ड्रोन सिस्टमचा (Anti-Drone System) वापर आज 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) करण्यात आला. शनिवार, 15 ऑगस्ट निमित्त दिल्लीतील (Delhi) लाल किल्ल्याजवळ (Red Fort) हे ड्रोन्स तैनात करण्यात आले होते.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेली सिस्टम 3 किलोमीटरच्या परिसरातील मायक्रो डोन्संना (Micro Drones) डिटेक्ट करुन त्यांची यंत्रणा जॅम करु शकते. त्याचप्रमाणे 1-2.5 किलोमीटरच्या अंतरामधील लेझर हत्याऱ्यांना (Laser Weapon) निकामी करण्याची क्षमता या सिस्टम मध्ये आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. त्यामुळे देशाच्या पश्चिम आणि उत्तरेकडील वाढत असलेल्या ड्रोन अॅक्टीव्हटीला चाप बसवण्यासाठी ही सिस्टम परिणामकारक ठरु शकते.

ANI Tweet:

आज सकाळी 7.30 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले. त्यानंतर मोदींनी देशाविसांना संबोधित केले. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. तसंच त्यांनी गलवान खोऱ्यातील शहीदांच्या बलिदानालाही सलाम केला. ('आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी भारतीयांचा मंत्र बनला आहे'; स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाल किल्ल्यावरुन देशावासियांशी संवाद)

दरम्यान, कोरोना योद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास ते विसरले नाहीत. देशातील 3 कोरोना लसी विकासाच्या टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. त्याचबरोबर त्याचबरोबर 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'ची देखील घोषणा केली.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर, सीमा रेषांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गालबोट लावू नये, म्हणून सुरक्षा यंत्रणा सज्ज असतात.