Independence Day PM Narendra Modi Speech: कोरोना लस कधी बनणार यावर पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन दिले 'हे' उत्तर
PM Narendra Modi (Photo Credits: Youtube)

Independence Day 2020: भारत आज आपला 74 वा स्वातंंत्र्य दिवस साजरा करत असला तरी जागतिक महामारी कोरोनामुळे (Coronavirus)  प्रत्येक जण लॉकडाउन (Lockdown)  मध्येच अडकुन पडला आहे. या मुद्द्यावरुन आज पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी लाल किल्ल्यावरुन (Red Fort)  भाषण करताना देशवासियांंना आधार दिला. मोदी म्हणतात की, कोरोनाची लस (COVID 19 Vaccine) कधी बनणार हा सर्व जगाला पडलेला प्रश्न आहे, मात्र मी तुम्हाला हा विश्वास देतो की जेव्हा कधीही कोरोनाची लस बनेल तेव्हा अगदी कमीत कमी वेळात त्याचे भरपुर उत्पादन करुन देशाच्या कानाकोपर्‍यातील गरजु पर्यंत पोहचवण्यात येईल यासाठी संंपुर्ण प्लॅनिंग व रुपरेषा तयार आहे. लवकरच देश या महामारीवर मात करुन पुन्हा एकदा पुर्व पदावर येईल आणि आपल्याला हे करुन दाखवायचे आहे.

Indian Independence Day 2020: भारत शेजारी राष्ट्रांसोबत सौदार्य टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी;  15 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंंटल्याप्रमाणे, देशात कोरोनावरील तीन लसींंची चाचणी सुरु आहे. या चाचण्या सध्या विविध टप्प्यात आहेत.जसा संशोधकाकडून हिरवा कंदील मिळेल तशी ती उपलब्ध केली जाईल. देशभरातील वैज्ञानिक या साठी दिवसरात्र राबत आहेत आणि लवकरच ही लस सापडेल असा विश्वास आहे.

पंंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह

दरम्यान, यंंदा पहिल्यांंदाच स्वातंत्र्यदिन हा आत्मनिर्भर या थीमवर आधारित साजरा केला जात आहे. देशाच्या संंरक्षणापासुन ते आरोग्यापर्यंत सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यावरच देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल असे म्हणत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांंनी व्होकल द लोकल या उपक्रमाला पाठिंंबा देण्याचे आवाहन केले आहे.