स्वातंत्र्यदिनानिमित्त बुर्ज खलिफा इमारतीवर तिरंगा रंगाची उधळण झालेली पाहायला मिळाली. सध्या सोशल मीडियावर या नयनरम्य नजाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पुणे शहरात आज नव्याने 1 हजार 073   कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

बहराइच पोलिसांनी पूरातच राष्ट्रीय ध्वज फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. ट्विट-

 

राजस्थानमध्ये आज 1287 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून  16 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इंद्रजित महंती यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

महेंद्रसिंग धोनी हा यशस्वी कर्णधार तसेच अष्टपैलू खेळाडू होता, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

 

तेलंगणा मधील भद्राचलम शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाण्याने 45 फूटचा टप्पा ओलांडला आहे.

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 12,614 रुग्ण आढळून आले असून 322 जणांचा बळी गेला आहे.

भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी नंतर आता  सुरेश रैना याची सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून  निवृत्तीची घोषणा केली आहे.

गोव्यात आज कोरोनाचे आणखी 369 रुग्ण आढळून आल्याने आकडा 11,339 वर पोहचला आहे.

Load More

आज भारताचा 74वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. त्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत तयारी करण्यात आली आहे. आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान यंदा भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने खास तयारी केली जात आहे. सोशल डिस्टंसिंग पाळत हा सोहळा पार पडणार आहे. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनापासून महाराष्ट्रात मंत्रालय, बीएमसी कार्यालय. रेल्वेस्थानकावर तिरंग्याची रोषणाई केली आहे.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण करण्यापूर्वी ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींजीच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. देशासमोर असलेल्या आर्थिक, आरोग्य संकटावर मोदी काय बोलणार याकडे लक्ष आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

भारतामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल 24 तासांत नव्या 64,553 रूग्नांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे 1007 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतामध्ये सध्या 6,61,595 जणांवर कोविड 19 साठी उपचार सुरू आहेत.