Rafale Induction Ceremony: भारतीय वायुसेनेमध्ये आज दाखल होणार राफेल लढाऊ विमान
राफेल विमान (Photo Credits: Twitter)

भारताला शत्रूंचा सामना करण्यासाठी,अधिक बलशाली करण्यासाठी राफेल  लढाऊ विमानाची (Rafale Fighter Aircraft )आज (10 सप्टेंबर) औपचारिकरित्या दाखल करून घेतले जाणार आहे. दरम्यान सकाळी 10 च्या सुमारास अंबाला (Ambala) येथील एअर बेस (Air Force Station) मध्ये विधिवत त्याला समाविष्ट करून घेतले जाणार आहे. हे विमान आता वायुसेनेच्या 17व्या स्क्वाड्रन 'गोल्डन अ‍ॅरो' चा एक भाग असतील.  राफेल लढाऊ विमानं आज या सोहळ्या दरम्यान हवेत झेपावणार आहेत. त्यावेळेस तेजस विमानांसोबत सारंग एयरोबेटिक टीम देखील सहभागी असणार आहे. जाणून घ्या राफेल लढाऊ विमानाची काय आहेत वैशिष्ट्यं  .

आज राफेलला समाविष्ट करून घेण्याच्या या शानदार सोहळ्यामध्ये भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सचे संरक्षण फ्लोरेंस पार्ली (Florence Parly) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सोबतच या ऐतिहासिक क्षणी Chief of Defence Staff जनरल बिपिन रावत, वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांच्यासोबत अनेक सरकारी आणि सशस्त्र दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात सहभागी होणाऱ्या फ्रेंच शिष्टमंडळात फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनाइन, फ्रान्सच्या वायुसेनेचे उपप्रमुख एअर जनरल एरिक ऑटेलेट, दसॉल्त अ‍ॅव्हिएशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर आणि क्षेपणास्त्र उत्पादक कंपनी एमबीडीएचे सीईओ एरिक बेरांजर यांचा समावेश असेल.

राफेल  लढाऊ विमान

 

Florence Parly यांचं भारतामध्ये आगमन  

 

राफेल विमानांचा हवाई दलाच्या 17 व्या स्क्वाड्रनमध्ये समावेश होण्यापूर्वी राफेलच्या ताफ्याला पाण्याच्या तोफांची (वॉटर कॅनन) पारंपरिक सलामी दिली जाणार आहे. तशी वायुदलामध्ये जुनी प्रथा आहे.

दरम्यान 29 जुलै दिवशी फ्रान्स मधून पाच राफेल विमानांची तुकडी भारतामध्ये दाखल झाली होती. दरम्यान भारत आणि फ्रान्स सरकारने करार करत सुमारे 36 राफेल विमानं खरेदी केली आहेत. हा व्यवहार अंदाजे 59 हजार कोटी रूपयांचा झाला आहे.