
भारतात (India) आज 8 ऑक्टोबर रोजी हवाई दल दिनानिमित्त (Indian Air Force Day) पहिले राफेल (Rafale) विमान दाखल होणार आहे. भारताचे संरक्षणमंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह (Rajnath Singh) फ्रान्सला (France) पोहचले आहेत. राजनाथ सिंह मंगळवारी फ्रान्सची राजधानी पॅरिस (Paris) येथे भारतीय परंपरेनुसार शस्त्र पूजन करतील. राजनाथ सिंह फ्रांन्सच्या एअरबेसवरुन राफेलच्या विमाणातून उड्डाणही करणार आहेत. राफेल हे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त एक लढाऊ विमान आहे. दसॉ यांच्याशी झालेल्या कराराच्या पहिल्या तुकडीमध्ये, भारतात हवाई दल दिनानिमित्त 36 राफेल विमानांची खरेदी करणार आहे. परंतु, भारताला आज 1 राफेल विमान मिळणार असून पुढील राफेल विमान येत्या काही महिन्यातच भारतात दाखल होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
राफेल विमानाची वैशिष्ट्ये :-
राफेल असे लढाऊ विमान आहे ज्याला कुठल्याही प्रकारच्या मिशनवर पाठवले जाऊ शकते. भारतीय वायुदलाची यावर खूप काळापासून नजर होती. हे एका मिनिटात 60 हजार फुटांची उंची गाठू शकते. याची इंधन क्षमता 17 हजार किलोग्रॅम आहे. राफेल कुठल्याही प्रकारच्या हवामानात एका वेळी अनेक कामे करण्यास सक्षम आहे. म्हणून याला मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखले जाते. याच्यात असलेले स्काल्प क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करण्यात सक्षम आहे. राफेलची मारा करण्याची क्षमता 3 हजार 700 कि.मी. पर्यंत आहे तर स्काल्पची रेंज 300 कि.मी. आहे. विमानाची इंधन क्षमता 17 हजार कि.ग्रॅ. आहे. हे अँटी शिप अटॅक, परमाणू हल्ला, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लाँग रेंज मिसाइल अटॅकमध्ये अव्वल आहे. राफेल 24 हजार 500 किलोपर्यंतचं वजन वाहून नेऊ शकते आणि 60 तासांपर्यंत अतिरिक्त उड्डाण करू शकते. याचा वेग 2 हजार 223 कि.मी. प्रति तास आहे.
भारतीय लष्कराच्या ताफ्यात राफेल विमानाचा समावेश झाल्याने देशाचे सामर्थ्य वाढणार आहे. माहितीनुसार, भारताने 59 कोटींत 36 राफेल विमान खरेदी केली आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत सर्व 36 राफेल विमान भारतात पोहोचतील. यासाठी भारतीय हवाई दल आवश्यक पायाभूत सुविधा तयार करून पायलटस प्रशिक्षणासह तयार करीत आहे.