Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. याच दरम्यान बूस्टर डोस देण्यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. केंद्र सरकारने असे म्हटले आहे की, अद्याप या प्रकारावर विविध अभ्यास केला जात आहे. त्यानुसार कोविड19 चा बूस्टर डोस किती गरजेचा आहे हे त्यामध्ये प्रामुख्याने पाहिले जात आहे. सरकारने असे म्हटले आहे की, लस ही व्हायरसपेक्षा 100 टक्के सुरक्षा देऊ शकत नाही. नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी एका पत्रकार परिषदेत असे म्हटले की, जर बूस्टर डोस गरजेचा असल्यास तर त्याबद्दल माहिती दिली जाईल. पुढे त्यांनी सांगितले की, सध्या लसीकरणाच्या मोहिमेत आम्ही प्रत्येकाला या महासंकटापासून सुरक्षित करु इच्छितो.

बूस्टर डोस संदर्भात अभ्यास सुरु आहे. कोवॅक्सिनचे ट्रायल ही सुरु असून 6 महिन्यानंतर बूस्टर डोस घेण्याची गरज आहे की नाही यावर पॉल यांनी म्हटले की, फक्त गाइडलाइन्सचे पालन करावे, लसीचे दोन्ही डोस घ्या आणि कोविडच्या परिस्थितीमधील वागणूकीवर लक्ष द्या. तुम्ही गंभीर आजारापासून सुरक्षित आहात. तरीही सावधगिरी बाळगा. ही सुरक्षा 100 टक्के नाही आहे.(COVID-19 Vaccination: भारतामध्ये 2021 पूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होणार - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर)

पॉल यांनी पुढे म्हटले की, बूस्टर डोसच्या गरजेसह त्याच्या वेळेबद्दल कळल्यानंतर त्या संबंधित गाइडलाइन्स आणि नियम लोकांना सांगितले जातील. खरंतर अमेरिकेतील महारोग विशेषज्ञ डॉ. एंथनी फाउची यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसच्या विरोधातील लस घेणाऱ्या लोकांना बूस्टर शॉटची गरज भासू शकते. तर मला वाटते की, लस घेतल्यानंतर मिळणाऱ्या सुरक्षेचा कालावधी अनंत असणार आहे. असे होणार नाही. यासाठीच आपल्याला बूस्टर शॉटची गरज भासू शकते. सध्या आम्ही हे माहित करुन घेत आहोत की, बूस्टर शॉट लस घेतल्यानंतर किती कालावधीनंतर दिला पाहिजे.

संशोधकांकडून वॅक्सीनच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची निगराणी केली जात आहे. त्यामधून असे पाहिले जात आहे की, त्यांच्यामध्ये व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी किती दिवसांची क्षमता आहे. आतापर्यंत लस 6 महिने ते एका वर्षाच्या कालावधीसाठी प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. तर भारत बायोटेकने मंगळवारी कोवॅक्सिनच्या तिसऱ्या बूस्टर डोसचे ट्रायल सुरु केले आहे. या ट्रायलमध्ये हे तपासून पाहिले जाणार आहे की, खरंच बूस्टर डोस असा इम्यून रिस्पॉन्स तयार करु शकतो का जो काही वर्षापर्यंत कायम राहिल.