COVID 19 Precautionary Dose Online Appointments: आजपासून सुरू होणार 'बुस्टर डोस' साठी ऑनलाईन अपॉईंटमेंट; पहा कसा, कधी, कोणाला मिळणार डोस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोविड 19 लसीचे यापूर्वी दोन्ही डोस घेतलेल्या हेल्थकेअर वर्कर्स अर्थात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कस आणि 60 वर्ष आणि त्यापेक्षा वरील सहव्याधी असणारे नागरिक 10 जानेवारीपासून तिसरा डोस घेऊ शकतात.
भारतामध्ये वाढती ओमिक्रॉनची (Omicron) दहशत आणि कोरोनाबाधितांची संख्या पाहता 3 जानेवारीपासून वयवर्ष 15-18 साठी कोविड 19 लसीकरण सुरू झाल्यानंतर आता देशात बुस्टर डोस (Booster Dose) अर्थात Precautionary Dose देण्यासाठी 10 जानेवारी सोमवार पासून सुरूवात होत आहे. आज (8 जानेवारी) पासून त्याच्या रजिस्ट्रेशनला सुरूवात होत आहे. दरम्यान काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तिसर्या डोस साठी कोविन अॅप वर पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही तसेच लाभार्थ्यांना वॉक इन (Walk In) देखील लस मिळणार आहे. त्यामुळे आता तिसरा डोस नेमका कुणाला, कधी, कसा मिळणार आहे याचा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर जाणून घ्या त्यासंबंधी सारे अपडेट्स!
COVID 19 Precautionary Dose कसा, कधी, कुणाला मिळणार?
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोविड 19 लसीचे यापूर्वी दोन्ही डोस घेतलेल्या हेल्थकेअर वर्कर्स अर्थात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कस आणि 60 वर्ष आणि त्यापेक्षा वरील सहव्याधी असणारे नागरिक 10 जानेवारीपासून तिसरा डोस घेऊ शकतात. ऑनलाईन अपॉईंट घेऊन किंवा थेट वॉक ईन स्वरूपातही त्यांना लस मिळू शकते.
- आज 8 जानेवारी दिवशी संध्याकाळी याबाबतचे सविस्तर शेड्युल जारी केले जाणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांना ऑनलाईन अपॉईंटमेंट घेता येणार आहे.
- वॉक ईन साठी थेट 10 जानेवारीला नोंद केली जाईल. हे देखिल नक्की वाचा: Booster Dose Guidelines: मुंबईत 10 जानेवारी पासून दिला जाणार बूस्टर डोस, BMC ची 'अशी' असेल नियमावली .
- कोविड 19 लसीचा Precautionary Dose हा पूर्वी घेतलेलाच डोस असणार आहे. म्हणजे कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोविशिल्डचाच तिसरा डोस आणि कोवॅक्सिन, स्फुटनिक व्ही च्या लसीसाठीदेखील तसाच नियम असणार आहे.
- दुसर्या डोस नंतर 39 आठवड्यांचा म्हणजे किमान 9 महिने झाल्यानंतर आता तिसरा डोस मिळणार आहे.
भारतामध्ये काल 150 कोटी लसींच्या डोसचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. कोरोनापासून सुराक्षित राहण्यासाठी नागरिकांनी आता कोविड 19 नियमावलीचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचे आहे असे आवाहनदेखील केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2022 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

